MPSC Recruitment : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी 2023 वर्ष संपत असतानाच एक अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे. ही बातमी एमपीएससीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी अधिक महत्त्वाची ठरणार आहे.

कारण की, एमपीएससीने विविध विभागाअंतर्गत येणाऱ्या रिक्त पदाच्या 842 रिक्त जागासाठी भरती जाहीर केली आहे. विशेष म्हणजे यासाठीची अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे.

यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून एमपीएससीच्या नवीन भरतीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांची प्रतीक्षा आता संपणार असे चित्र तयार होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 5 डिसेंबर 2023 रोजी या पदभरती अंतर्गत 7 शासकीय विभागांमधील 842 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

दरम्यान आता आपण कोणत्या शासकीय विभागांमध्ये किती जागा रिक्त आहेत, या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अर्ज केव्हा करता येईल आणि अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक काय असेल याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कोणत्या विभागात किती रिक्त जागा

एमपीएससीने जारी केलेल्या या जाहिरातीनुसार, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभागात रिक्त पदांच्या तब्बल ७७४ जागा भरल्या जाणार आहेत. या पदभरतीमध्ये सर्वाधिक रिक्त जागा वैद्यकीय विभागातच आहेत.

वैद्यकीय विभागाखालोखालोल इतर मागास बहुजन कल्‍याण विभागातल्या रिक्त पदांच्या ५७ जागा या भरतीच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत. तसेच गृह विभागातील ६ रिक्त जागा या एमपीएससीच्या भरती मधून भरल्या जाणार आहेत.

उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि सामान्य प्रशासन विभाग या दोन विभागातील प्रत्येकी एक जागा या भरतीच्या माध्यमातून भरणे प्रस्तावित करण्यात आले आहे. याशिवाय पाणीपुरवठा व स्‍वच्‍छता विभागातील रिक्त पदांच्या तीन जागा या भरतीच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत.

केव्हा सुरू होणार अर्ज प्रक्रिया

MPSC ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार येत्‍या पाच दिवसांत अर्थातच १२ डिसेंबर 2023 पासून या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे.

इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करायचा आहे. तसेच 12 डिसेंबर पासून सुरू होणारी अर्ज प्रक्रिया 1 जानेवारी 2024 पर्यंत सुरू राहणार आहे. म्हणजेच इच्छुकांना एक जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *