Most Populous City In World : भारत, आर्यवर्त, हिंदुस्थान, जंबुद्वीप, भारतखंड, हिमवर्ष, अजनाभवर्ष, भारतवर्ष, हिंद, आणि इंडिया अशा काही नावाने आपल्या देशाला ओळखले जाते. सध्या मात्र भारत, हिंदुस्तान आणि इंडिया या तीन नावांचा सर्वाधिक वापर होत आहे. दरम्यान, भारत सरकारने नुकत्याच काही दिवसांपूर्वी झालेल्या G20 शिखर परिषद येथे इंडिया ऐवजी भारत यां नावाचा वापर केला होता.
अर्थातच आता सरकारही भारत या नावालाच प्रमोट करण्याच्या प्रयत्नात आहे. भारताला जवळपास नऊ ते दहा नावे आहेत. भारत देश क्षेत्रफळानुसार जगातील सातवा सर्वात मोठा देश म्हणून ओळखला जातो. मात्र लोकसंख्याच्या बाबतीत आपल्या देशाने अनेक देशांना धोबीपछाड दिली आहे.
लोकसंख्येच्या बाबतीत आता भारत चीनलाही ओव्हरटेक करणार अशी शक्यता आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी एका रिपोर्ट मध्ये असा दावा करण्यात आला होता की भारताने लोकसंख्येच्या बाबतीत चीनला मागे टाकले आहे.
म्हणजेच सदर अहवालानुसार भारत हा सध्या स्थितीला जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे. भारतानंतर चायनाचा नंबर लागतो. मात्र अधिकृतरित्या अजूनही चीन हा लोकसंख्येच्या बाबतीत भारताच्या पुढे आहे.
भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा लोकसंख्या असलेला देश आहे. मात्र, एवढी विशालकाय लोकसंख्या असलेल्या देशात सर्वात जास्त लोकसंख्या कोणत्या शहरात आहे? याचे उत्तर तुम्हाला माहितीये का? नाही, मग आज आपण याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.
भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर
एका आकडेवारीनुसार आपल्या भारत देशात जवळपास 39 अशी शहरे आहेत ज्या शहरांची लोकसंख्या दहा लाखांपेक्षा अधिक आहे. यामध्ये महाराष्ट्रातील बहुतांशी शहरांचा समावेश आहे. यात राज्यातील सुवर्ण त्रिकोणातील तिन्ही शहरांचा समावेश होतो.
सुवर्णं त्रिकोण अर्थातच नाशिक, मुंबई आणि पुणे हे या दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांच्या यादीत येतात. मात्र, देशातील सर्वात जास्त लोकसंख्या कोणत्या शहरात आहे? आम्ही आपणास सांगू इच्छितो की, देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्र राज्याची राज्य राजधानी मुंबई हे देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर बनले आहे.
विशेष म्हणजे मुंबईमधील लोकसंख्या आहे दिवसेंदिवस वाढतच आहे. हे केवळ भारतातील सर्वात जास्त लोकसंख्येचे शहर आहे असे नाही तर जगातील सर्वात जास्त लोकसंख्येचे शहर बनले आहे. एका आकडेवारीनुसार मुंबई या शहराची एकूण लोकसंख्या एक करोड 26 लाख 91 हजार 836 एवढी आहे.
तसेच या शहरात लोकसंख्येची घनता 21 हजार चौरस किलोमीटर एवढी आहे. म्हणजेच प्रत्येक किलोमीटरला जवळपास 21,000 लोक वास्तव्याला आहेत. मुंबई शहराला बंबई, मुंबई, बॉम्बे अशा कित्येक नावाने ओळखले जाते.