Maruti Suzuki Swift 2024 : मारुती सुझुकी ही देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी आहे. मारुती सुझुकीने त्यांच्या अनेक नवीन कार भारतात सादर केल्या आहेत.
तसेच भारतातील ऑटो सेगमेंट मजबूत कारण्यासाठी मारुती सुझुकी त्यांच्या आणखी नवीन कार सादर करणार आहे.
मारुती सुझुकी कार उत्पादक कंपनीकडून त्यांची लोकप्रिय स्विफ्ट कारचे नवीन जनरेशन मॉडेल या वर्षात लाँच केले जाणार आहे. नवीन जनरेशन स्विफ्ट कारची मारुती सुझुकीने चाचणी देखील सुरु केली आहे.
नवीन जनरेशन स्विफ्ट कारमध्ये कंपनीकडून अनेक मोठे बदल केले जाणार आहेत. कारच्या डिझाईनपासून फीचर्सपर्यंत अनके बदल केल्याचे पाहायला मिळेल. कारला आणखी स्पोर्टी लूक देण्यात आला आहे.
जपानमधील टोकियो ऑटो शोमध्ये मारुतीने त्यांची नसून जनरेशन स्विफ्ट कार सादर केली आहे. आता मारुती सुझुकी त्यांची नवीन जनरेशन स्विफ्ट कार 2024 मध्ये भारतात लाँच करणार आहे.
जानेवारी किंवा फेब्रुवारी 2024 मध्ये नवीन स्विफ्ट कार लाँच केली जाईल. स्विफ्ट कारमध्ये 1.2 लिटर पेट्रोल आणि 1.2 लिटर पेट्रोल मजबूत हायब्रिड इंजिन दिले जाण्याची शक्यता आहे.
कारचे हायब्रीड इंजिन कारचे मायलेज वाढवण्यास सक्षम असेल. नवीन मारुती स्विफ्ट कार 24 Kmpl मायलेज देण्यास सक्षम असेल. नवीन स्विफ्ट कारची अनेकदा चाचणी देखील घेण्यात आली आहे.
नवीन जनरेशन स्विफ्ट वैशिष्ट्ये
नवीन जनरेशन हायब्रीड स्विफ्ट कारमध्ये वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले कनेक्टिव्हिटी, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर,
नवीन मल्टी-फंक्शनल स्टीयरिंग व्हील आणि HVAC नियंत्रणांसह 9-इंच फ्री-स्टँडिंग टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम असे फीचर्स दिले जाऊ शकतात.
नवीन जनरेशन स्विफ्ट डिझाईन
नवीन स्विफ्ट कारच्या डिझाईनमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. नवीन स्विफ्ट कारमध्ये नवीन एलईडी टेल लॅम्प आणि हेडलॅम्प देण्यात आले आहेत.
तसेच कारला आणखी स्पोर्टी लूक देखील देण्यात आला आहे. कारमध्ये नवीन डिझाईन केलेले ग्रिल देण्यात आले आहे.