Maruti Suzuki Car Discount Offer : नवीन वर्षाचा पहिला महिना संपला आहे. मात्र असे असले तरी अजूनही अनेकजण नवीन वाहन खरेदी करणार आहेत. जर तुम्ही ही नवीन कार खरेदी करण्याच्या तयारीत असाल, तुम्ही या चालू महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीमध्ये नवीन कार खरेदी करण्यासाठी बाहेर पडणार असाल तर आधी आजची ही संपूर्ण बातमी वाचा.
खरे तर मारुती सुझुकी ही देशातील सर्वाधिक कार विक्री करणारी कंपनी आपल्या काही लोकप्रिय मॉडेल्सवर लाखों रुपयांची सूट देत आहे. यामुळे ग्राहकांना स्वस्तात मारुती सुझुकीची कार खरेदी करता येणार आहे.
जर तुम्हालाही मारुती सुझुकीची कार खरेदी करायची असेल तर तुम्ही या डिस्काउंट ऑफरचा लाभ घेऊन स्वस्तात मारुती सुझुकीची नवीन गाडी खरेदी करू शकता. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया मारुती सुझुकी कंपनीकडून नेमक्या कोणत्या मॉडेल वर किती रुपयांची सूट ऑफर केली जात आहे.
कोणत्या गाडीवर मिळतोय सर्वाधिक डिस्काउंट
मीडिया रिपोर्ट नुसार मारुती सुझुकी या कंपनीकडून आपल्या लोकप्रिय जिम्नी या कारवर सर्वाधिक डिस्काउंट ऑफर केला जात आहे. या गाडीवर कंपनीकडून दीड लाख रुपयांचा डिस्काउंट ऑफर केला जात आहे. याशिवाय या गाडीवर तीन हजार रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट देखील दिला जात आहे.
मारुती सियाज या कारवर मिळतोय मोठा डिस्काउंट
याशिवाय कंपनीकडून मारुती सियाज या कारच्या वेगवेगळ्या मॉडेलवर 25 हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट, 25 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि तीन हजार रुपयांची कॉर्पोरेट सूट ऑफर केली जात आहे.
इग्निसवर मिळते हजारो रुपयांची सूट
कंपनीच्या 2024 मॉडेलच्या इग्निस या कारवर ग्राहकांना 20,000 रुपयांची रोख सूट, 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 4,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट ऑफर केली जात आहे. तसेच या कारच्या 2023 च्या मॉडेलवर ग्राहकांना 40,000 रुपयांची रोख सूट, 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 4,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट ऑफर केली जात आहे.
b
मारुती सुझुकी या लोकप्रिय कंपनीच्या माध्यमातून आपल्या लोकप्रिय बलेनो या कारवर देखील हजारो रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, याशिवाय मारुती बलेनोच्या विविध मॉडेल्सवर रोख सवलत आणि एक्सचेंज बोनससह 37,000 रुपयांपर्यंत सूट ऑफर केली जात आहे.