Maruti Suzuki Electric Car : भारतात गेल्या काही वर्षांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा बाजार मोठा वाढला आहे. इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये देशातील अनेक प्रमुख कंपन्यांनी आपल्या कार लॉन्च केल्या आहेत. इलेक्ट्रिक सेगमेंटचा विचार केला असता सध्या स्थितीला टाटा मोटर्स कंपनीचा भारतीय मार्केटमध्ये बोलबाला आहे. या कंपनीने सर्वाधिक इलेक्ट्रिक कार लॉन्च केल्या आहेत.
इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये टाटाचे मार्केट शेअर 75 टक्के एवढे आहे. म्हणजेच 75 टक्के इलेक्ट्रिक गाड्या टाटा मोटर्सच्या आहेत. आता मात्र टाटा मोटर्सची ही मक्तेदारी तोडण्यासाठी देशातील काही प्रमुख कंपन्यांनी कंबर कसली आहे.
आता मारुती सुझुकी ही कंपनी देखील इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये आपला जलवा दाखवणार आहे. यासाठी कंपनी लवकरच आपली पहिली वहिली इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार आहे. मारुती सुझुकी ही देशातील सर्वात जास्त कार विक्री करणारी कंपनी आहे.
भारताच्या कानाकोपऱ्यात या कंपनीची लोकप्रियता पाहायला मिळते. दरम्यान कंपनीने नुकत्याच पार पडलेल्या भारत मोबिलिटी एक्स्पो दरम्यान eVX ही पहिली इलेक्ट्रिक कार प्रदर्शित केली आहे. कंपनीची ही तीच संकल्पना आहे जी गेल्या वर्षी ऑटो एक्सपो 2023 आणि जपान मोबिलिटी शो 2023 मध्ये प्रदर्शित करण्यात आली होती.
केव्हा लॉन्च होणार पहिली इलेक्ट्रिक कार
मीडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवला तर मारुती सुझुकी ही आपली पहिली इलेक्ट्रिक कार या वर्षाच्या अखेरपर्यंत अर्थातच 2024 अखेरपर्यंत लॉन्च करणार आहे. मात्र अजूनही कंपनीने याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही.
शिवाय, गाडीची संपूर्ण डिटेल देखील समोर येऊ शकलेली नाही. पण, अधिकृत लॉन्चच्या अगोदर Maruti ची आगामी इलेक्ट्रिक SUV चाचणी दरम्यान दिसली आहे. यावरून उत्पादन मोडमध्ये असताना या आगामी गाडीचे डिझाईन समोर आलेले आहे.
कशी राहणार eVX
मारुती सुझुकी कंपनीची ही अपकमिंग इलेक्ट्रिक कार कॉन्सेप्ट अवतार प्रमाणेच हेडलाइट सेटअप, रस्त्यावर आक्रमक उपस्थितीसह एक विशाल बोनेट आणि एकात्मिक निर्देशकांसह स्वयंचलित ORVMS सह दिसलेली आहे. या ईव्हीला एका विशेष प्लॅटफॉर्मवर विकसित केले जाईल. यामुळे ही कार चांगल्या दर्जाची आणि विश्वासार्ह बनणार आहे.
ही अपकमिंग इलेक्ट्रिक कार eVX 60kWh बॅटरी पॅकसह येणार आहे. ही कार एक चांगला ड्रायव्हिंग अनुभव देण्यास सक्षम राहील असे बोलले जात आहे. ही कार एकदा चार्ज केल्यावर सुमारे 550 किलोमीटरची कमाल रेंज देऊ शकते, असा दावा होत आहे. त्यामुळे ही गाडी दैनंदिन प्रवासासह लॉन्ग रूटसाठी देखील फायदेशीर ठरणार आहे. मात्र कंपनीने या संदर्भात काहीच माहिती दिलेली नाही.
किंमत किती राहणार ?
मारुती सुझुकी कंपनीची ही पहिली इलेक्ट्रिक कार 22 ते 23 लाख रुपयाच्या सुरुवातीच्या किमतीत बाजारात लॉन्च होणार असा अंदाज आहे. मात्र याबाबत कंपनीकडून अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे या गाडीच्या सविस्तर फीचर्ससाठी आणि किमतीसाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.