Maruti Invicto Launched : मारुती सुझुकी कंपनीकडून त्यांची आतापर्यंतची सर्वात महागडी कार लॉन्च करण्यात आली आहे. मारुती सुझुकी कंपनीची ही ७ सीटर कार आहे. भारतामध्ये ही कार आज लॉन्च करण्यात आली आहे. त्यामुळे मारुती सुझुकी कार प्रेमींना आणखी एक नवीन कारचा पर्याय मिळाला आहे.
मारुती सुझुकी आणि टोयोटाच्या यांच्या भागीदारीतून ही कार तयार करण्यात आली आहे. टोयोटा इनोव्हा हायक्रॉसवर आधारित मारुती सुझुकी कंपनीकडून ही कार लॉन्च करण्यात आली आहे.
मारुती सुझुकी कंपनीकडून लॉन्च करण्यात आलेल्या त्यांच्या कारचे नाव Invicto आहे. ही त्यांची सर्वात महागडी कार आहे. ही कार इनोव्हा हायक्रॉसवर आधारित असली तरी तिच्या फीचर्स आणि डिझाईनमध्ये बदल करण्यात आला आहे.
या कारमध्ये जबरदस्त इंजिन देण्यात आले आहे. या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 24.79 लाख रुपये आहे. तर याच कारच्या टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 28.42 लाख रुपये आहे.
मारुती सुझुकी कंपनीकडून Invicto या कारची बुकिंग सुरू करण्यात आली आहे. तुम्ही देखील NEXA डीलरशिपद्वारे ही कार बुक करू शकता. यासाठी तुम्हाला २५ हजार रुपये भरून कार बुक करावी लागेल.
मारुती सुझुकी कंपनीकडून Invicto कारचे ३ मॉडेल सादर अरण्यात आले आहेत. ही कार कंपनीकडून 7-सीटर आणि 6-सीटर अशा दोन्ही मॉडेलमध्ये सादर केली आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कार बुक करू शकता.
इंटीरियर आणि वैशिष्ट्ये
मारुती Invicto ला एक नवीन 10.1-इंच फ्री-स्टँडिंग टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आली आहे. तसेच कारमध्ये वायरलेस ऍपल कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटोला सपोर्ट करते.
या कारमध्ये 360-डिग्री कॅमेरा, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, पॅडल शिफ्टर, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, पॉवर फ्रंट सीट्स, अॅम्बियंट लाइटिंग, पॉवर्ड टेलगेट, पॅनोरॅमिक सनरूफ, लेदर सीट्स अशी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.
इंजिन आणि त्याची क्षमता
मारुती सुझुकी कंपनीकडून या कारमध्ये मजबूत इंजिन देण्यात आले आहे. या कारमध्ये 2.0 लिटर क्षमतेचे हायब्रीड इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 172 Bhp पॉवर आणि 188 Nm टॉर्क जनरेट करते.
तसेच कारमध्ये हायब्रीड इंजिन देखील देण्यात आले आहे. या कारमधील इलेक्ट्रिक मोटार देखील चांगली पॉवर आउटपुट प्रदान करते. हे इंजिन ई-सीव्हीटी ट्रान्समिशन गिअरबॉक्सशी जोडण्यात आले आहे.
मारुती इन्व्हिक्टोचे प्रकार आणि किमती
मॉडेल | एक्स शोरूम किंमत |
Invicto Zeta Plus (7 Seater) | 24.79 लाख रुपये |
Invicto Zeta Plus (8 Seater) | 24.84 लाख रुपये |
Invicto Alpha Plus (7 Seater | 28.42 लाख रुपये |