Mahindra Scorpio 2023 : महिंद्रा कंपनीच्या अनेक कार भारतीय ऑटो क्षेत्रामध्ये चांगली दमदार कामगिरी करत आहेत. तसेच या कंपनीच्या कार मजबुतीसाठी आणि दमदार फीचर्ससाठी ओळखल्या जातात. कंपनीकडून ग्राहकांसाठी अनेक कार सादर केल्या जात आहेत.
महिंद्रा कंपनीकडून गेल्या काही महिन्यांपूर्वीच महिंद्रा स्कॉर्पिओचे नवीन मॉडेल बाजारात सादर केले आहे. या नवीन महिंद्रा स्कॉर्पिओला ग्राहकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता पुन्हा एकदा महिंद्रा स्कॉर्पिओचा नवीन लूक समोर आला आहे.
महिंद्रा कंपनी ऑटो क्षेत्रातील दमदार कामगिरी करणारी कंपनी म्हणून मानली गेली आहे. महिंद्रा कंपनीकडून नव्याने सादर करण्यात आलेली महिंद्रा स्कॉर्पिओ एन एसयूव्हीची मार्च महिन्यामध्ये अधिक विक्री केली आहे.
महिंद्रा स्कॉर्पिओ कार 2023
महिंद्रा कंपनीकडून काही काळापासून चांगल्या सेगमेंटची वाहनेही बाजारात सादर केली जात आहेत. या एसयूव्ही सेगमेंटमध्येही ती यशस्वी करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. महिंद्रा कंपनीकडून स्कॉर्पिओ कारमध्ये अनेक बदल केले जात आहेत. कारचे डिझाईन आणि फीचर्समध्ये बदल केला जात आहे.
महिंद्रा स्कॉर्पिओच्या वैशिष्ट्यांबद्दल
महिंद्रा कंपनीकडून स्कॉर्पिओमध्ये सर्वोत्तम फीचर्स देण्यात आले आहेत. त्यामुळे ग्राहकांचा चांगला प्रतिसाद या कारला मिळत आहे. जेव्हापासून ही कार बाजारात उपलब्ध झाली आहे तेव्हापासून या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
महिंद्रा स्कॉर्पिओमध्ये मोठ्या टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, फ्लॅट बॉटम, स्टीयरिंग व्हील, इलेक्ट्रिक सनरूफ, 360 डिग्री पार्किंग कॅमेरा, डिजिटल एमआयडी, ड्युअल टोन लेदर अपहोल्स्ट्री आणि कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी यांसारख्या नवीनतम तांत्रिकदृष्ट्या प्रगत वैशिष्ट्यांचा समावेश करण्यात आला आहे.
गेल्या महिन्यातील स्कॉर्पिओ विक्रीचा रेकॉर्ड
महिंद्रा कंपनीच्या स्कॉर्पिओ कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरवर्षी या कारच्या विक्रीत वाढ होताना दिसत आहे. मार्चच्या शेवटच्या महिन्यात महिंद्राने स्कार्पिओ एन आणि स्कार्पिओ क्लासिकच्या 2023 मध्ये एकूण 8,788 कार विकल्या आहेत.
जे मागील वर्षी याच महिन्यात 6,061 कार विकल्या होत्या. स्कॉर्पिओ नेमप्लेटने वार्षिक आधारावर 44.99 टक्के वाढ दर्शविली आहे. एसयूव्हीने महिन्या-दर-महिना विक्रीत २६.४५ टक्के वाढ नोंदवली आहे.