Mahindra New SUV : भारतातील दिग्गज ऑटो कंपनी महिंद्रा लवकरच बाजारात एक नवीन SUV लॉन्च करणार आहे. विशेष म्हणजे ही नवीन कार चालवण्यासाठी पेट्रोल-डिझेल किंवा चार्जिंगची गरज लागणार नाही.
कारण की, ही गाडी फ्लेक्स फ्युलवर चालणार आहे. महिंद्रा या देशातील लोकप्रिय ऑटो कंपनीने ही नवीन SUV भारत मोबिलिटी एक्सपो मध्ये सादर केली आहे.
महिंद्राने XUV300 चे फ्लेक्स फ्युलवर चालणारे नवीन प्रोटोटाईप या ऑटो एक्सपोमध्ये सादर केले आहे. त्यामुळे लवकरच महिंद्राची पहिली फ्लेक्स फ्युलवर चालणारी कार बाजारात येणार हे स्पष्ट होत आहे.
दरम्यान आता आपण महिंद्राने सादर केलेल्या Mahindra XUV 300 फ्लेक्स फ्युल कारच्या विशेषता थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Mahindra XUV 300 फ्लेक्स फ्युलचे इंजिन कसे राहणार ?
सध्या दिल्ली येथील प्रगती मैदानावर भारत मोबिलिटी एक्सपो 2024 सुरु आहे. या इव्हेंटमध्ये XUV300 Flex Fuel SUV सादर करण्यात आली आहे.
दरम्यान आता आपण या फ्लेक्स फ्युल SUV चे इंजिन पावर ट्रेन कसे आहे हे पाहणार आहोत. हाती आलेल्या माहितीनुसार ही कार W6 प्रकारावर आधारित आहे.
या कारमध्ये 1.2-लिटर, इनलाइन तीन-सिलेंडर, टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन बसवण्यात आले आहे, जे की, मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.
ही मोटर 109bhp पॉवर आणि 200Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम राहणार असा दावा केला जातोय.
केव्हा लाँच होणार ?
महिंद्राची ही Mahindra XUV 300 फ्लेक्स फ्युल बाजारात केव्हा लॉन्च होणार हा सवाल अनेकांच्या माध्यमातून उपस्थित केला जातोय. मीडिया रिपोर्ट नुसार ही गाडी 2025 च्या सुरुवातीला बाजारात येऊ शकते.
कंपनी 2025 च्या सुरुवातीला या गाडीचे प्रोडक्शन सुरू करेल आणि त्यानंतर ही गाडी बाजारात लाँच होणार अशी माहिती समोर येत आहे.