Mahavitaran Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड सोलापूर अंतर्गत प्रशिक्षणार्थी/ शिकाऊ उमेदवारांसाठी नोकरीची उत्तम संधी आहे. येथे 50 जागांसाठी भरती होत असून, उमेदवारांकडून यासाठी अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. तरी उमेदवारांनी लवकरात लवकर यासाठी अर्ज करावेत.

पदाचे नाव आणि पदसंख्या

वरील भरती वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन), तारतंत्री (वायरमन) पदांच्या एकूण 50 रिक्त जागांवर होत आहे.

शैक्षणिक पात्रता

या पदांसाठी आय.टी.आय. परीक्षा उत्तीर्ण (तारतंत्री (वायरमन)/ वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) असलेला उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहे.

अर्ज शुल्क

यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाहीत.

वेतनमान

वरील पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 7,700/- रुपये ते 8,050/- रुपये इतके वेतन मिळेल.

नोकरी ठिकाण

ही भरती सोलापूर (महाराष्ट्र) येथे होणार आहे.

अधिकृत वेबसाईट

या भरती संबंधित अधिक माहितीसाठी www.mahadiscom.in या वेबसाईटला भेट द्या.

असा करा अर्ज

-या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://www.apprenticeshipindia.gov.in/ या वेबसाईटद्वारे करायचा आहे.
-लक्षात घ्या अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील, दुसऱ्या कोणत्याही मार्गे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
-या पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

भरती जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *