Maharashtra Upcoming Expressway : येत्या काही तासात नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. वर्ष 2023 मध्ये महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरातील विविध विकास प्रकल्पांच्या कामांचे लोकार्पण झाले आहे. देशाला 2023 मध्ये अनेक महत्त्वाच्या महामार्गाची भेट मिळाली आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुधारण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करण्यात आले आहेत. यामुळे देशातील दळणवळण व्यवस्था आधीच्या तुलनेत अधिक सक्षम झाली असल्याचे पाहायला मिळत आहे.
विशेष म्हणजे 2024 मध्ये देखील देशाला आणखी पाच महत्त्वाच्या महामार्गाची भेट मिळणार आहे. दरम्यान आज आपण देशात 2024 मध्ये कोणते पाच महामार्ग सुरू होणार आहे याबाबत सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्रासाठी खूपच महत्त्वाचा मार्ग आहे. हा महामार्ग राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर यांना जोडणारा आहे.
701 किलोमीटर लांबीचा हा मार्ग सर्वात आधी 2022 मध्ये अंशतः खुला करण्यात आला. डिसेंबर 2022 मध्ये या मार्गाचा पहिला टप्पा अर्थातच नागपूर ते शिर्डी हा सुरू झाला. नागपूर ते शिर्डी हा 520 km चा टप्पा सुरू झाल्यानंतर में 2023 मध्ये शिर्डी ते भरविर हा 80 किलोमीटरचा टप्पा सुरू झाला.
आता उर्वरित 101 किलोमीटर लांबीचा भाग येत्या नवीन वर्षात सुरू होणार आहे. म्हणजे संपूर्ण समृद्धी महामार्ग नवीन वर्षात सर्वसामान्यांसाठी खुला होणार आहे. त्यामुळे मुंबई ते नागपूर असा थेट प्रवास समृद्धी महामार्गाने करता येणार आहे.
मुंबई-दिल्ली महामार्ग : आर्थिक राजधानी मुंबई आणि राष्ट्रीय राजधानी दिल्ली यांना जोडणारा हा मार्ग येत्या नवीन वर्षात सुरू होण्याची शक्यता आहे. 1386 किलोमीटर लांबीचा हा मार्ग सुरू झाल्यानंतर मुंबई ते दिल्ली हा प्रवास फक्त 12 तासात पूर्ण करता येऊ शकतो असा दावा केला जात आहे.
या मार्गाचा पहिला टप्पा नुकताच सुरू झाला आहे. आता हा संपूर्ण महामार्ग येत्या नवीन वर्षात सर्वसामान्यांसाठी सुरू होणारा असा दावा केला जात आहे. हा मार्ग, दिल्ली, हरियाणा, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र या पाच राज्यांमधून जाणारा एक महत्त्वाचा महामार्ग राहणार आहे.
बेंगलोर-चेन्नई एक्सप्रेस वे : बेंगलोर आणि चेन्नई ही दोन भारतातील महत्त्वाची शहरे आहेत. या दोन्ही शहरांना रस्ते मार्गाने जोडण्यासाठी नवीन महामार्गाची निर्मिती केली जात आहे. हा एक राष्ट्रीय महामार्ग राहणार असून याची लांबी 262 किलोमीटर एवढी राहील.
द्वारका एक्सप्रेस वे : दिल्लीतील द्वारका ते हरियाणातील गुरुग्राम यादरम्यान विकसित होणाऱ्या महामार्गाला द्वारका एक्सप्रेस वे म्हणून ओळखले जात आहे. या महामार्गाची एकूण लांबी 29 किलोमीटर एवढी आहे. या मार्गामुळे द्वारका ते गुरुग्राम हा प्रवास सुपरफास्ट होणार आहे. हा देखील मार्ग येत्या नवीन वर्षात सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.