Maharashtra Tourist Spot : अनेकजण हिवाळ्यात फिरायला निघत असतात. मान्सून काळात ज्याप्रमाणे पर्यटन स्थळांवर गर्दी होती तशीच गर्दी हिवाळ्यातही पाहायला मिळते. जर तुम्हीही हिवाळ्यात फिरायला निघणार असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खूपच खास राहणार आहे.
कारण की आज आपण हिवाळ्यात फिरायला जाणाऱ्यांसाठी महाराष्ट्रातील काही प्रसिद्ध पर्यटन स्थळांची माहिती घेऊन जर झालो आहोत.
यामुळे फिरायला निघण्यापूर्वी तुम्ही आजची ही बातमी सविस्तर वाचायला हवी. खरंतर महाराष्ट्रात फिरण्यासाठी अनेक लोकप्रिय ठिकाणे आहेत. दरम्यान आज आपण महाराष्ट्रातील टॉपची तीन पर्यटन स्थळे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
वेरूळ अजिंठा एलोरा लेण्या : जर तुम्हाला ऐतिहासिक ठिकाणांना भेट देण्याची आवड असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी परफेक्ट राहणार आहे. अजिंठा आणि एलोरा लेण्या हे महाराष्ट्रातील लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. हा एक बौद्धकालिन वास्तूशिल्पाचा उत्कृष्ट नमुना आहे.
यामुळे जर तुम्हाला ऐतिहासिक ठिकाणांना भेट देण्याची आवड असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी परफेक्ट ठरू शकते. विशेष म्हणजे या लेण्यांचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश करण्यात आला आहे.
अशा परिस्थितीत जागतिक वारसा स्थळांना भेटीत देऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे ठिकाण निश्चितच बेस्ट ऑप्शन ठरणार आहे. या लेण्यांना ज्या लोकांना भेटी द्यायच्या असतील ते लोक मराठवाड्यातील इतरही अन्य पर्यटन स्थळांना भेटी देऊ शकतात.
बीबी का मकबरा : मराठवाड्यातील आणखी एक लोकप्रिय ऐतिहासिक वास्तू म्हणून बीबी का मकबरा संपूर्ण जगात चीरपरिचित आहे. या ठिकाणाला दरवर्षी लाखो लोक भेटी देत असतात. बारा महिने येथे पर्यटकांची वर्दळ पाहायला मिळते. जर तुम्हीही या हिवाळ्यात कुठे फिरायचा प्लॅन बनवत असाल तर हे ठिकाण तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकते.
मुघल शासक सम्राट औरंगजेबाची पत्नी दिलरस बानू बेगम हिच्या स्मरणार्थ तयार झालेला हा मकबरा हुबेहूब ताजमहालासारखी दिसते. यामुळे जर तुम्हाला मराठवाड्यात येऊन ताजमहालाचा आनंद घ्यायचा असेल तर या वास्तूला तुम्ही भेट देऊ शकता आणि तुमची ट्रिप एन्जॉय करू शकता.
दौलताबाद किल्ला : दौलताबाद किल्ला हे मराठवाड्यातील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. येथे दरवर्षी हजारो पर्यटक भेटी देतात. जे लोक मराठवाड्याला भेटी देतात ते आवर्जून या ठिकाणाला येतात. यामुळे जर तुम्हीही मराठवाडा एक्सप्लोर करण्यासाठी निघणार असाल तर हे ठिकाण स्किप करून चालणार नाही.
हा किल्ला 200 मीटर उंचीवर आहे. विशेष म्हणजे हा किल्ला शंकाकृती पर्वतावर वसलेला आहे. हा किल्ला 12 व्या शतकात बांधून तयार झाला आहे. यामुळे जर तुम्हाला प्राचीन वास्तू बघण्याचा छंद असेल किंवा किल्ल्यांवर भेट देण्याची आवड असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरणार आहे.