Maharashtra ST News : महाराष्ट्रात लालपरीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ही सर्वाधिक आहे. मामाच्या गावाला जायाला, शाळा, कॉलेज, कामाला जाण्यासाठी लालपरी एक हक्काचे व्यासपीठ बनले आहे.

यामुळे हे एक प्रवासाचे साधन नसून महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांशी एसटी महामंडळाच्या एसटी बसेस सोबत एक खास नात तयार झाले आहे.

मात्र या लालपरीचा प्रवास आता अनेकांना नकोसा होऊ लागला आहे ही वस्तुस्थिती देखील नाकारून चालता येणार नाही. पण आता लवकरच लालपरीचा प्रवास देखील सर्वसामान्यांना हवाहवासा वाटणार आहे.

कारण की लालपरी आता लवकरच कात टाकण्याच्या मूडमध्ये आहे. यासाठी एसटी महामंडळाने एक धमाकेदार प्लॅन देखील तयार केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार राज्यात कार्यरत असलेल्या 15,000 एसटी बसेस पैकी जवळपास 5000 एसटी बसेस या नॅचरल गॅसवर चालवल्या जाणार आहेत. या बसेसच्या डिझेल इंजिनचे एलएनजी मध्ये कन्वर्जन केले जाणार आहे.

विशेष म्हणजे ज्या बसेस सात ते आठ वर्षे जुन्या आहेत त्याच बस यासाठी वापरल्या जाणार आहेत. सध्या स्थितीला या बसेसची माहिती जमवण्याचे काम महामंडळाच्या माध्यमातून युद्धपातळीवर सुरू आहे.

विशेष असे की या कामासाठी आवश्यक असलेली निविदा प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. यातून काही कंपन्यांसोबत करार झाला असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

एवढेच नाही तर एल एन जी गॅस भरण्यासाठी 90 डेपो उभारले जाणार असून यासाठीच्या हालचाली देखील आता वाढल्या आहेत.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एलएनजी गॅसवर चालणाऱ्या एसटी बसचे तिकीट दर देखील सध्या जे तिकीट दर आहे तेवढेच राहणार आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावरील ताण वाढणार नाही.

एलएनजी गॅस सोबतच 1000 सीएनजी गॅसवर चालणाऱ्या बसेस देखील महामंडळाकडून सुरू केल्या जाणार आहेत. यासाठी बस गाड्यांचे इंजिन बदलावे लागणार आहे. विशेष म्हणजे या सीएनजी बसेस मध्ये गॅस भरण्यासाठी 14 ठिकाणे चिन्हीत करण्यात आली आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *