Maharashtra Railway News : महाराष्ट्रासहित संपूर्ण भारतात प्रवासासाठी रेल्वे हे एक महत्त्वाचे साधन आहे. रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ही खूपच उल्लेखनीय आहे. रेल्वेचा प्रवास हा सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा तसेच सुरक्षित प्रवास म्हणून ओळखला जातो. भारतीय रेल्वेचे नेटवर्क हे देशातील कानाकोपऱ्यात पसरलेले आहे.
त्यामुळे जर एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात प्रवास करायचा असेल तर सर्वात आधी रेल्वेला पसंती मिळते. दरम्यान मुंबई, पुणे आणि नागपूर मधील रेल्वे प्रवाशांसाठी अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे.
खरे तर मध्य रेल्वेने काही विशेष एक्सप्रेस गाड्यांना पुन्हा एकदा मुदतवाढ देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेने सणासुदीच्या काळात वाढलेली गर्दी लक्षात घेता काही मार्गांवर विशेष एक्सप्रेस गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलेला होता.
दरम्यान, या एक्सप्रेस गाड्यांमध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने मध्य रेल्वेने या विशेष एक्सप्रेस गाड्यांना मुदतवाढ देण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे.
अशा परिस्थितीत आता आपण मध्य रेल्वेने कोणत्या विशेष एक्सप्रेस गाड्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे हे थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणत्या विशेष एक्सप्रेस गाड्यांना मिळाली मुदतवाढ ?
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते नागपूर या दरम्यान सुरू करण्यात आलेल्या द्विसाप्ताहिक ट्रेनला मुदत वाढ देण्यात आली आहे.
तसेच नागपूर ते पुणे यादरम्यान सुरू करण्यात आलेल्या साप्ताहिक विशेष ट्रेनला देखील मुदतवाढ मिळाली आहे. खरे तर सीएसएमटी-नागपुर द्वि साप्ताहिक विशेष एक्सप्रेस ट्रेन 15 फेब्रुवारी पर्यंत चालवली जाणार होती मात्र आता ही गाडी 30 मे पर्यंत चालवली जाणार आहे.
याशिवाय नागपूर-सीएसएमटी द्वीसाप्ताहिक विशेष एक्सप्रेस ट्रेन 17 फेब्रुवारी पर्यंत चालवली जाणार होती मात्र आता ही गाडी एक जून पर्यंत चालवली जाणार आहे. या गाडीच्या प्रत्येकी 30 फेऱ्या म्हणजेच अपमार्गावर 30 आणि डाऊन मार्गावर 30 फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत.
दुसरीकडे, नागपूर-पुणे साप्ताहिक विशेष गाडी 15 फेब्रुवारी पर्यंत चालवली जाणार होती मात्र आता ही गाडी 30 मे पर्यंत चालवली जाणार आहे. तसेच पुणे-नागपूर साप्ताहिक विशेष गाडी 16 फेब्रुवारी पर्यंत चालवली जाणार होती मात्र आता ही गाडी 31 मे 2024 पर्यंत चालवली जाणार आहे.
म्हणजेच या गाडीच्या प्रत्येकी 15 फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. यामुळे मुंबई ते नागपूर आणि पुणे ते नागपूर या दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार अशी आशा व्यक्त होत आहे.