Maharashtra Picnic Spot : पर्यटकांसाठी आजची बातमी खूपच खास राहणार आहे. जर तुम्हीही वीकेंडला कुठे फिरायला घराबाहेर पडणार असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अधिक महत्वाची राहणार आहे.
कारण की आज आपण महाराष्ट्रातील सर्वात लहान आणि निसर्गरम्य पर्यटन स्थळाबाबत माहिती जाणून घेणार आहोत.
पुरोगामी महाराष्ट्रात अशी अनेक ठिकाण आहेत जी की, एक्सप्लोर केली जाऊ शकतात. राज्यात शेकडो पर्यटन स्थळे आहेत. यामध्ये अनेक हिल स्टेशनचा देखील समावेश होतो.
दरम्यान जर तुम्हीही एखाद्या हिल स्टेशनला फिरायला निघणार असाल तर तुमच्यासाठी माथेरान हा पर्याय सर्वोत्कृष्ट ठरणार आहे. माथेरान हे महाराष्ट्रातील एक हॉट फेवरेट पिकनिक स्पॉट आहे.
हे हिल स्टेशन पर्यटकांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. याची खासियत म्हणजे हे राज्यातील सर्वात लहान हिल स्टेशन आहे. अवघ्या सात किलोमीटरच्या परिघात वसलेले हे हिल स्टेशन खूपच फेमस आहे.
1850 मध्ये हे हिल स्टेशन विकसित करण्यात आले होते. या ठिकाणी दरवर्षी हजारोंच्या संख्येने पर्यटक भेटी देत असतात. येथे येणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे.
मुंबई आणि पुण्यातील पर्यटक या ठिकाणी वीकेंडला मोठ्या प्रमाणात हजेरी लावत असतात. माथेरानला प्रदूषण मुक्त ठेवण्यासाठी या ठिकाणी कोणत्याच वाहनाला परवानगी देण्यात आलेली नाही.
यामुळे माथेरान एक्सप्लोर करण्यासाठी एक तर पायी फिरावे लागते किंवा मग घोड्याने फिरावे लागते. या ठिकाणी एक टॉय ट्रेन देखील चालवली जाते. नेरळ ते माथेरानदरम्यान ही टॉय ट्रेन चालवली जात आहे.
या ठिकाणी फिरण्यासाठी अनेक स्पॉट आहेत. येथे तब्बल 35 हून अधिक पॉईंट्स आहेत जेथून माथेरानची सुंदरता आपल्या नजरेत कैद करता येऊ शकते.
जर तुम्हाला माथेरानला जायचे असेल तर मुंबई आणि पुण्यातून नेरळ जंक्शन पर्यंत तुम्हाला ट्रेन उपलब्ध होणार आहे. मग नेरळ हुन माथेरानला जाण्यासाठी तुम्ही टॉय ट्रेनने जाऊ शकणार आहात. कर्जत येथूनही माथेरानला जाता येऊ शकते.