Maharashtra Picnic Spot : येत्या काही दिवसात पावसाळ्याला सुरुवात होणार आहे. हवामान खात्याने मान्सूनबाबत नुकतीच एक मोठी गुड न्युज दिली आहे. हवामान खात्याने म्हटल्याप्रमाणे यंदा मान्सूनचे वेळे आधीच आगमन होण्याची शक्यता आहे. यंदा अंदमानात 19 मे ला मान्सूनचे आगमन होणार असून 31 मे च्या सुमारास मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता आहे.
यामध्ये मात्र तीन-चार दिवस मागे पुढे होऊ शकतात. म्हणजेच 28 मे ते 3 जून दरम्यान मान्सूनचे केरळमध्ये आगमन होऊ शकते असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. तसेच 8 जून च्या सुमारास महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन होऊ शकते. मात्र जेव्हा मान्सून केरळमध्ये पोहोचेल तेव्हाच याबाबत योग्य ती माहिती कळू शकणार आहे.
तथापि मान्सून आगमनासाठी सर्व गोष्टी पोषक असून लवकरच मान्सून आपल्या महाराष्ट्रात दाखल होणार आहे. पावसाळा सुरू झाला की मग अनेकजण पर्यटनासाठी बाहेर निघणार आहेत.
दरम्यान जर तुमचाही पावसाळी पिकनिकला जाण्याचा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच खास ठरणार आहे. कारण की आज आपण राज्यातील पावसाळी पिकनिक साठी फेमस असलेल्या काही पिकनिक स्पॉटची माहिती पाहणार आहोत.
नाणेमाची वॉटर फॉल्स : नानेमाची वॉटरफॉल्स अर्थातच धबधबा पर्यटकांमध्ये खूपच प्रसिद्ध आहे. हे कोकणातील एक सुंदर असे पावसाळी पिकनिक स्पॉट आहे. या ठिकाणी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पर्यटकांची वर्दळ पाहायला मिळते. हे ठिकाण रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात आहे.
मुंबईपासून अवघ्या 220 किलोमीटर अंतरावर वसलेले हे ठिकाण खूपच विलोभनीय आहे. येथील नैसर्गिक नजारा तुमच्या डोळ्याचे पारणे फेडणार आहे. जवळपास चारशे फूट उंचीवरून खाली पडणारा हा धबधबा खूपच रोमहर्षक अनुभव देऊन जातो. हा मंत्रमुग्ध करणारा धबधबा या पावसाळ्यात नक्कीच एक्सप्लोर करा.
ताम्हिणी घाट : महाराष्ट्रात फिरण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. ताम्हिणी घाट हे देखील असेच एक ठिकाण आहे. या घाटाला लाभलेले अद्भुत नैसर्गिक सौंदर्य वाखाण्याजोगे आहे. हा महाराष्ट्रातील एक प्रमुख घाटरस्ता आहे. हा रस्ता पुणे जिल्ह्यातील मुळशी आणि रायगड जिल्ह्यातील माणगांव यांना जोडतो.
सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये वसलेल्या पश्चिम घाटामध्ये असलेले निसर्गरम्य ठिकाण म्हणजे ताम्हिणी घाट. जर तुम्हाला यंदा पावसाळी पिकनिक साठी बाहेर पडायचे असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी बेस्ट ठरणार आहे.
लोणावळा : लोणावळा हे राज्यातील एक प्रमुख हिल स्टेशन आहे. येथे बाराही महिने पर्यटकांची गर्दी असते. परंतु पावसाळा सुरू झाल्यानंतर पर्यटकांच्या गर्दीत काहीशी वाढ होत असते. जर तुम्ही ही यंदा पावसाळ्यात कुठे बाहेर पडणार असाल तर लोणावळ्याला नक्कीच भेट द्या. लोणावळा तलाव, टायगर पॉइंट, खंडाळा पॉइंट आणि राजमती किल्ला हे लोणावळ्यातील काही प्रसिद्ध स्पॉट आहेत जे तुम्ही नक्कीच एक्सप्लोर केले पाहिजेत.
पाचगणी : हे देखील राज्यातील एक प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. हे छोटेसे हिल स्टेशन निसर्गतः खूप सुंदर आहे. मात्र या ठिकाणाची सुंदरता पावसाळ्यात आणखी वाढते. यामुळे तुम्ही पावसाळ्यात पाचगणीला नक्कीच भेट देऊ शकता. तुम्ही तुमच्या परिवारासमवेत किंवा मित्रांसमवेत पाचगणीला विजिट करू शकता आणि तुमची पावसाळी पिकनिक आनंदात घालवू शकता.