Maharashtra Picnic Spot : तुमचेही स्वतःच्या वाहनाने राज्यातील तसेच देशातील प्रमुख प्रसिद्ध पर्यटन स्थळांना भेट देण्याचे स्वप्न आहे का? मग आजची ही बातमी तुमच्यासाठी खास राहणार आहे. खरे तर अलीकडे रोड ट्रिपला विशेष महत्त्व आले आहे.

वीकेंड आला की अनेकजण आपल्या टू व्हीलरवर किंवा मग कारवर ट्रिप साठी बाहेर निघतात आणि रोड ट्रिपचा आनंद घेतात. मात्र, राज्यात असेही एक फेमस पर्यटन स्थळ आहे जिथे वाहने घेऊन जाता येत नाही.

म्हणजेच या पर्यटन स्थळाला भेट द्यायची असेल तर पायीच फिरावे लागते. वाहने पर्यटन स्थळापासून दूर अंतरावर पार्क करून या सुंदर पर्यटन स्थळाला पायी चालत भेट द्यावी लागते.

हेच कारण आहे की या ठिकाणी अजूनही सुंदरता कायम आहे. येथे वाहनांचा वापर होत नसल्याने येथील नजारा अजूनही पाहण्यासारखा आहे.

कोणते आहे ते ठिकाण

आम्ही ज्या पर्यटन स्थळाबाबत बोलत आहोत ते महाराष्ट्रातील सर्वात छोटे हिल स्टेशन. हे सर्वात छोटे हिल स्टेशन खूपच निसर्गरम्य आहे. हो, बरोबर विचार करताय तुम्ही, आम्ही बोलत आहोत माथेरान विषयी.

माथेरान हे महाराष्ट्रातील असे एक पर्यटन स्थळ आहे जिथे थेट वाहनाने पोहोचता येत नाही. येथील शुद्ध आणि थंडगार हवा, डोंगर, दऱ्या, छोटे धबधबे यांचे विहंगम दृश्य हे पर्यटकांना भुरळ घालतात. येथील दाट धुके अन चहूबाजूची हिरवळ स्वर्गासारखा अनुभव देऊन जाते.

पावसाळ्यात माथेरानची सुंदरता खूपच वाढते. तथापि हिवाळ्यात देखील हजारो पर्यटक येथे भेटी देतात. यामुळे हिवाळा ऋतू देखील येथे जाण्यासाठी सर्वोत्कृष्ट आहे.

कसं पोहचणार इथं

माथेरान शहर हे सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये 2,600 फूट उंचीवर असलेले एक प्रसिद्ध ठिकाण आहे. माथेरान हिल स्टेशन हे समुद्रसपाटीपासून 803 मीटर उंचीवर आहे.

दरम्यान आता माथेरानमध्ये वाहनांना नो एन्ट्री असल्याने येथे कसे पोहचले जाऊ शकते याविषयी आपण जाणून घेणार आहोत. मुंबईहून बदलापूर-कर्जत रस्त्याने नेरळचा घाट चढल्यावर माथेरनच्या पायथ्यापर्यंत पोहचता येते.

इथपर्यंत वाहनांना एन्ट्री आहे. पण, येथून पुढे वाहनांना नो एन्ट्री आहे. येथून माथेरान हिल स्टेशनची हद्द सुरु होते. येथे गेल्यावर वाहने पार्क करुन मग पर्यटकांना पुढचा प्रवास पायीच करावा लागतो. चालत, ढकलगाडी अथवा घोड्यावर बसून माथेरान मधील विविध ठिकाणांना भेटी देता येतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *