Maharashtra Picnic Spot : तुम्ही थंडीत मनसोक्त हिंडण्याचा प्लॅन बनवत आहात का ? हो, मग आजची ही बातमी तुमच्यासाठी खूपच खास राहणार आहे. खरंतर, हिवाळा ऋतू पर्यटनासाठी खूपच खास असतो. हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक पर्यटन स्थळांवर गर्दी करतात.
दरम्यान जर तुम्हीही थंडीत फिरायला निघणार असाल तर तुमच्यासाठी आज आम्ही महाराष्ट्रातील काही जगप्रसिद्ध पर्यटन स्थळांची माहिती घेऊन हजर झालो आहोत.
आज आपण कोकणातील काही प्रसिद्ध पर्यटन स्थळाविषयी जाणून घेणार आहोत. खरं तर कोकणात फिरण्यासारखी अनेक प्रसिद्ध पिकनिक स्पॉट आहेत. यातील काही पिकनिक स्पॉटला हिवाळ्यात भेट दिली तर तुमची ट्रिप मनोरंजक होणार आहे.
अलिबाग : अलिबागला लाभलेला समुद्रकिनारा हा येथील सुंदरता वाढवत आहे. जर तुम्ही हिवाळ्यात कोकण दर्शनासाठी जाणार असाल तर एकदा तुम्ही अलिबागला भेट दिली पाहिजे.
हे ठिकाण मुंबई पासून अवघ्या शंभर किलोमीटरच्या अंतरावर वसलेले आहे. येथील बीच आणि कनकेश्वर किल्ला हा खूपच प्रसिद्ध आहे.
गणपतीपुळे : कोकणातील आणखी एक सुंदर ठिकाण. येथे दरवर्षी हजारो पर्यटक भेटी देत असतात. येथे दररोज पर्यटकांची वर्दळ पाहायला मिळते.
कोणताही ऋतू असो गणपतीपुळेला फिरायला हजारोंच्या संख्येने नागरिक येत असतात. रत्नागिरी जिल्ह्यातील हे ठिकाण पर्यटकांमध्ये खूपच लोकप्रिय आहेत. येथील गणपतीचे मंदिर हे महत्त्वाचे आकर्षण केंद्र आहे.
काशीद : तुम्ही जर अलिबागला फिरायला गेलात तर अलिबाग पासून अवघ्या काही किलोमीटरच्या अंतरावर असलेला काशीद समुद्रकिनारा नक्की एक्सप्लोर करा.
या परिसरात एक प्रसिद्ध अभयारण्य आणि जगप्रसिद्ध जंजिरा किल्ला तुम्हाला पाहायला मिळेल. कोकणातील ट्रिप काशीदला गेल्याशिवाय अपूर्ण राहू शकते.
दिवेआगर : येथे देखील एक समुद्रकिनारा आहे. मात्र या समुद्रकिनाऱ्याला फारशी लोकप्रियता मिळालेली नाही. हा सुंदर समुद्रकिनारा अनेकांना माहीत नाही. इथे तुम्हाला बीच रिसॉर्ट आणि नारळाच्या झुडपात असलेली इंद्रधनुष्य कॉटेज मिळतील. येथे राहून तुम्ही क्वालिटी टाईम स्पेंड करू शकता.