Maharashtra Picnic Spot : पावसाळ्यात ट्रेकिंगला बाहेर पडणाऱ्यांची संख्या ही खूपच अधिक असते. हिवाळ्यात देखील अनेक जण ट्रेकिंगसाठी निघत असतात. वीकेंडला ट्रेकिंगसाठी अनेकजण बाहेर पडत असतात. दरम्यान आजची ही बातमी अशाच दुर्गप्रेमींसाठी, ट्रेकर्ससाठी खूपच महत्त्वाची राहणार आहे.
कारण की आज आपण राज्यातील एका लोकप्रिय किल्ल्याची माहिती जाणून घेणार आहोत. येथे दररोज मोठ्या प्रमाणात पर्यटक भेटी देत असतात.
विशेष म्हणजे हा सह्याद्रीच्या कुशीत वसलेला किल्ला दुर्गप्रेमींमध्ये खूपच लोकप्रिय आहे. आम्ही ज्या किल्ल्याबाबत बोलत आहोत तो आहे नासिक जिल्ह्यातील धोडप किल्ला.
जिल्ह्यातील कळवणजवळील हा किल्ला दुर्गप्रेमी मध्ये खूपच लोकप्रिय आहे. हा किल्ला भटकंतीसाठी एक चांगला ऑप्शन ठरू शकतो.
मुंबईमधील नागरिकांना देखील येथे येणे खूपच सोयीचे ठरणार आहे. हा किल्ला सातमाळा डोंगररांगेत वसलेला आहे. हा किल्ला अगदी भगवान शंकराच्या पिंडी सारखा भासतो. या मनमोहक किल्ल्याला एक चौकोनी खाच देखील आहे.
खऱ्या अर्थाने हेच या किल्ल्याचे वेगळेपण आहे, या किल्ल्याची ही खरी ओळख आहे. नासिक पासून 60 ते 62 किलोमीटर अंतरावर हट्टी हे गाव आहे. हेच ठिकाण धोडप किल्ल्याचा पायथा आहे.
गावापासून साधारणता वीस ते पंचवीस किलोमीटरच्या अंतरावर धोडप किल्ल्याचा पायथा लागतो. किल्ल्यावर जाण्यासाठी जंगलातून पायवाट आहे. या वाटेवरूनच किल्ल्यावर पोहोचता येते.
किल्ल्यावर सोनार वस्ती, गणरायाचे मंदिर, भगवान महादेवाचे मंदिर, प्रवेशद्वार पाहायला मिळणार आहे. गडाच्या एका भागावर कातळ भिंत तयार झालेली आहे.
हा किल्ला तुम्ही एका दिवसात एक्सप्लोर करू शकता. यामुळे वीकेंडला फिरण्यासाठी हे सर्वोत्कृष्ट ठिकाण ठरते. जर तुम्हाला विकेंडला ट्रेकिंगला जायचे असेल तर धोडप किल्ला हा बेस्ट ऑप्शन राहणार आहे.
जर तुम्ही रोजच्या व्यस्त वेळापत्रकातून थोडासा वेळ निसर्गाच्या सानिध्यात स्पेंड करू इच्छित असाल तर या किल्ल्याला तुम्ही आवर्जून भेट दिली पाहिजे, तुमची ट्रिप ही आनंदाची होणार आहे.