Maharashtra News : राज्यात गेल्या काही वर्षांपासून विविध विकासाच्या प्रकल्पाची कामे हाती घेण्यात आली आहेत. पुढील वर्षात अर्थातच 2024 मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका रंगणार आहेत. याशिवाय महाराष्ट्रात विधानसभेच्या देखील निवडणुका राहणार आहेत. अशा परिस्थितीत शासनाच्या माध्यमातून सध्या सुरु असलेल्या विकास प्रकल्पांची कामे जलद गतीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
शिवाय काही नवीन प्रकल्पांची देखील कामे हाती घेण्यात आली आहेत. याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील लोणावळ्यात महाराष्ट्रातील पहिलावहिला ग्लास स्काय वॉक प्रकल्प उभारला जाणार आहे. लोणावळ्यातील टायगर आणि लायन्स पॉईंट येथे हा प्रकल्प तयार केला जाणार आहे.
दरम्यान या प्रकल्पाबाबत एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे. खरेतर हा प्रकल्प पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून पूर्ण केला जाणार आहे. या प्रकल्पासाठी जवळपास 333 कोटी 56 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.
याच्या प्रस्तावाला नुकतीच उच्चाधिकार समितीने मान्यता दिली असल्याचे वृत्त समोर आले आहे. यामुळे या प्रकल्पाला आता नवीन वर्षात गती मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. आम्ही आपणांस सांगू इच्छितो की, पीमआरडीएने राज्य शासनाच्या सूचनेनुसार या प्रकल्पाचा सविस्तर आराखडा म्हणजे DPR तयार केला आहे.
यानुसार पीएमआरडीएने या पर्यटनस्थळ विकासाच्या दृष्टीने विकास आराखडा तयार केला होता. मध्यँतरी या प्रस्तावाला मग जिल्हास्तरीय समितीची मान्यता मिळाली होती. त्यानंतर हा प्रस्ताव राज्य सरकारच्या उच्चाधिकार समितीला पाठविण्यात आला होता.
दरम्यान या समितीने या प्रकल्पाला मान्यता दिली आहे. यामुळे आता या ठिकाणी जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ विकसित होणार आहे. येथे दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक येत असतात. याच पार्श्वभूमीवर आता या ठिकाणी जागतिक दर्जाचा ग्लास स्काय वॉक प्रकल्प विकसित होणार आहे. यासंदर्भात पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल यांनी मोठी माहिती दिली आहे.
राहुल महिवाल यांनी सांगितल्याप्रमाणे या प्रकल्पांतर्गत या ठिकाणी रस्ते, उपाहारगृह, पाणी सुविधा, वाहनतळ, शौचालय, लहान मुलांसाठी साहसी खेळ खेळण्यासाठी गार्डन आणि यांसारख्या इतर सुविधा देखील तयार केल्या जाणार आहेत. दरम्यान आता आपण या प्रकल्पांतर्गत टायगर पॉईंट वर कोणकोणते कामे केले जाणार आहेत याविषयी थोडक्यात आणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसा आहे प्रकल्प ?
या प्रकल्पांतर्गत टायगर पॉईंट येथे ग्लास स्काय वॉक तयार होणार आहे. हा काचेचा स्काय वॉक जवळपास 125 मीटर लांब आणि 6 मीटर रुंद राहणार आहे. येथे एक हजार व्यक्तींसाठी ॲम्फी थिएटर सुद्धा विकसित होणार आहे. येथे प्रकाश व ध्वनी शो राहणार आहेत. तसेच येथे लहान मुलांसाठी खेळण्याची जागा देखील तयार केली जाणार आहे.
येथे प्रवेशद्वार व तिकीट घर सुद्धा विकसित केले जाणार आहे. येथे रस्ता रुंदीकरणाची कामे केली जाणार आहेत. 45 मीटर पर्यंत रस्ता रुंदीकरण केला जाणार आहे. येथे वाहनतळ सुद्धा होणार आहे. यात एकूण 1500 कार, दोन हजार स्कूटर पार्किंग करता येणार आहेत.
येथे गझिबो विकसित होईल. गझिबो हा 20 चौरस मीटरचा राहिल. यात विविध साहसी खेळ देखील राहणार आहेत. येथे 125 मीटर लांबीची झिप लाइन विकसित होणार आहे. तसेच वॉल क्लाइंबिग, बंजी जम्पिंग, फेरिस व्हील असे साहसी खेळ देखील येथे खेळता येणार आहेत.