Maharashtra News : सध्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. यामुळे सोने-चांदी, कपडे इत्यादी वस्तू खरेदीसाठी बाजारांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. बाजारपेठा सजल्या आहेत. सर्वत्र लग्नसराईमुळे आनंदाचे आणि प्रसन्न वातावरण पाहायला मिळत आहे. खरेतर, लग्नाचा हंगाम सूरू होऊन बरेच दिवस झाले आहेत. अनेकांच्या जुळून आलेल्या रेशीमगाठी बांधल्या गेल्या आहेत. दोनाचे चार हात झाले आहेत.
मात्र असे असले तरी दरवर्षी मे महिन्यातच लग्नाचे कार्य काढण्यास पसंती दाखवली जाते. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे या कालावधीत विद्यार्थ्यांना सुट्ट्या लागलेल्या असतात. शिवाय मे महिन्यात शेतीची कामे देखील बऱ्यापैकी मंदावलेली असतात. यामुळे शहरी भागातील नोकरदार वर्ग असो किंवा ग्रामीण भागातील शेतकरी वर्ग सर्वजण मे महिन्यातच लग्नाचे कार्य करण्याला पसंती दाखवतात.
लग्न असो किंवा मग वास्तुशांती असो असे कार्यक्रम दरवर्षी मे महिन्यातच मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. यंदा मात्र मे महिन्यात चक्क लग्न आणि वास्तुशांतीसाठी मुहूर्त नसल्याची माहिती मिळतं आहे. यावर्षी मे महिन्यात गुरु-शुक्र या ग्रहांचा अस्त आहे. यामुळे मे महिन्यापासून पुढील दीड महिने विवाहासाठी तथा वास्तुशांती कार्यक्रमांसाठी मुहूर्त राहणार नसल्याचे सांगितले गेले आहे.
यामुळे मे महिन्यापासून पुढील दीड महिने वास्तुशांती आणि लग्नकार्याला ब्रेक राहणार हे स्पष्ट होत आहे. म्हणजेच आता फक्त या चालू एप्रिल महिन्यातच वास्तुशांती आणि लग्नाचे कार्य काढता येणार आहे. एप्रिल झाल्यानंतर मग थेट जून महिन्यातच वास्तुशांती आणि लग्नकार्य काढता येणार आहे. हेच कारण आहे की, सध्या लग्नकार्यासाठी आणि वास्तुशांतीच्या पूजेसाठी सर्वत्र लगबग पाहायला मिळत आहे.
एप्रिल महिन्यात जेवढे मुहूर्त आहेत तेवढ्या साऱ्या मुहूर्तांवर मोठ्या प्रमाणात लग्न आणि वास्तुशांतीचे शुभ कार्य काढले जात आहे. आता एप्रिल महिन्यातील वीस दिवस बाकी आहेत आणि या कालावधीत जेवढे मुहूर्त असतील त्या मुहूर्तांवर लग्न कार्य अन वास्तुशांतीची पूजा आटोपून घ्यावी लागणार आहे. पंचांगानुसार यावर्षी मे महिन्यात सहा मे ते पंचवीस जून शुक्र अस्त आणि आठ मे ते एक जून पर्यंत गुरु अस्त आहे.
अशा कालावधीत मात्र कोणत्याच प्रकारचे यज्ञ किंवा धार्मिक कार्य केले जाऊ शकत नाही. यामुळे यंदा या कालावधीत विवाहसाठी आणि वास्तुशांतीसाठी मुहूर्त नाहीत. तथापि एप्रिलमध्ये विवाहासाठी आणि वास्तुशांतीसाठी मुहूर्त आहेत यामुळे ज्यांना जून महिन्यापर्यंत थांबता येणे शक्य राहणार आहे त्यांना आता या महिन्यातच घाईघाईने का होईना पण धार्मिक कार्य पार पाडावे लागणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार एप्रिल झाल्यानंतर थेट 29 जूनलाच वास्तुशांतीसाठी मुहूर्त आहे. यामुळे ज्यांना एप्रिल नंतर शास्त्रोक्त वास्तुशांतीचा कार्यक्रम करायचा असेल त्यांना आता 29 जून नंतरच मुहूर्त पहावा लागणार आहे. कारण की 29 जूनला जो मुहूर्त आहे त्या एका दिवसात शास्त्रोक्त वास्तुशांती होऊ शकत नाही.
याबाबत ज्योतिष अभ्यासक यांना विचारणा केली असता त्यांनी एप्रिल मधील विवाह आणि वास्तुशांती मुहूर्ता नंतर थेट जूनमध्येच मुहूर्त राहणार असल्याची माहिती दिली आहे. तथापि या कालावधीत आपत्कालीन मुहूर्त मात्र राहतील. पण, अशा मुहूर्तांवर अत्यंत आवश्यकता असेल तरच कार्य साध्य करण्याचा सल्ला ज्योतिष अभ्यासक यांनी दिलेला आहे.
आता आपण एप्रिल महिन्यातील विवाह मुहूर्त, आपत्कालीन विवाह मुहूर्त, वास्तुशांती मुहूर्त याबाबत जाणून घेणार आहोत. ज्योतिष अभ्यासक यांनी दिलेल्या माहितीनुसार एप्रिल महिन्यात 18, 20, 21, 22, 26, 28 या तारखांना विवाहाचे मुहूर्त आहेत. मे मध्ये एक आणि दोन तारखेला मुहूर्त आहेत.
दुसरीकडे आपातकालीन मुहूर्तबाबत बोलायचं झालं तर जून महिन्यात 12, 16 आणि 18 तारखेला हे मुहूर्त येतात. या महूर्तांवर विवाह केले जाऊ शकतात मात्र खूपच आवश्यक असेल तेव्हाच या मुहूर्तावर विवाह केला पाहिजे अन्यथा विवाह पुढे ढकलला पाहिजे.