Maharashtra News : राज्यात गेल्या काही वर्षांमध्ये विविध विकासकामे पूर्ण झाली आहेत, तसेच काही विकासाच्या प्रकल्पांची कामे सध्या सुरू आहेत. राज्यातील कृषी, उद्योग, पर्यटन, अध्यात्म अशा विविध क्षेत्राचा विकास करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या विकास प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली आहेत.
राज्यात विविध महामार्गांची कामे सुरु आहेत. तसेच राज्यातील पर्यटन स्थळांना देखील आता नवीन रूप देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
अशातच, आता राज्यातील माळशेज घाटात नवीन काचेचा पूल तयार होणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. यामुळे माळशेज घाटातील पर्यटन आणखी विस्तारणार आहे.
यामुळे तेथील पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. माळशेज घाट हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. येथे दरवर्षी हजारो, लाखोंच्या संख्येने पर्यटक हजेरी लावत असतात.
दरम्यान, आता माळशेज घाटाच्या सौंदर्यात आणखी भर पडणार आहे. हे निसर्गरम्य ठिकाण आणखी सुंदर होणार आहे. कारण की, राज्य शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी काचेच्या नवीन पुलाची निर्मिती केली जाणार आहे.
त्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या आगामी काळात आणखी वाढणार अशी आशा आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, या प्रकल्पाबाबत नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली आहे.
या बैठकीत हा प्रकल्प पी पी पी किंवा बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर विकसित करण्याचे ठरले आहे.
कुठं तयार होणार पूल ?
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माळशेज घाटमाथ्यावरील पठारावर असलेल्या विश्रामगृहलगत एक मजली इमारत आणि त्यासमोर काचेच्या पुलाची उभारणी केली जाणार आहे.
यामुळे हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर घाटमाथ्यावरील पठारावरून माळशेज घाटाचे मनमोहक सौंदर्य नजरेने टिपता येणार आहे. पठारावर विकसित होत असलेल्या या काचेच्या पुलावरून निसर्गाच मनमोहक सौंदर्य नजरेत कैद करता येणार आहे.
यासाठी मात्र कोट्यावधी रुपयांचा खर्च करावा लागणार आहे. मीडिया रिपोर्ट नुसार, या प्रकल्पासाठी सुमारे २६५ कोटी ९७ लाख रूपये खर्च केला जाणार आहे.