Maharashtra New Railway Line : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये विविध रस्ते मार्गांची आणि रेल्वे मार्गांची कामे पूर्ण झाली आहेत. यामुळे राज्यातील दळणवळण व्यवस्था आता आधीच्या तुलनेत अधिक मजबूत आणि सक्षम झाली आहे. परिणामी राज्यातील नागरिकांना जलद गतीने प्रवास करता येणे शक्य होत आहे.
मात्र असे असले तरी राज्यात असेही अनेक रेल्वे मार्ग आहेत ज्यांची कामे अजूनही पूर्ण झालेली नाहीत. गेल्या कित्येक वर्षांपासून या रेल्वे मार्गांची कामे केली जात आहेत मात्र या प्रकल्पांची कामे अजूनही पूर्ण होत नाही येत. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे.
रायगड जिल्ह्यात असाच एक रेल्वे मार्ग आहे ज्याचे काम गेल्या अडीच दशकांपासून सुरू आहे. नेरूळ ते उरण दरम्यान प्रस्तावित करण्यात आलेला रेल्वे मार्ग अजूनही पूर्णपणे सुरू झालेला नाही. याचे काम गेल्या 26 वर्षांपासून सुरू आहे.
2018 मध्ये या रेल्वे मार्गाचा पहिला टप्पा सुरू झालेला आहे मात्र याचा राहिलेला दुसरा टप्पा अजूनही पूर्ण झालेला नाही. नेरूळ ते खारकोपर हा रेल्वेमार्ग सध्या सुरू आहे मात्र खारकोपर ते उरण या रेल्वे मार्गाचे काम अजूनही बाकीच आहे.
त्यामुळे हा रेल्वे मार्ग प्रकल्प नेमका केव्हा सुरू होणार हाच सवाल सर्वसामान्यांच्या माध्यमातून उपस्थित होत आहे. या रेल्वे मार्ग प्रकल्पामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून थेट उरण पर्यंत लोकलने प्रवास करता येणे शक्य होणार आहे.
मात्र या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी मुहूर्त मिळत नसल्याने सर्वसामान्यांची गळचेपी होत आहे. सध्या स्थितीला उरणकरांना मुंबईकडील जर प्रवास करायचा असेल तर त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय.
पण आता या नव्या वर्षात उरणकरांना मोठी भेट मिळणार अशी आशा आहे. मिळालेल्या माहितीनुसार 12 जानेवारी 2024 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी अटल सेतूचे लोकार्पण करणार आहेत. यामुळे याच दिवशी खारकोपर ते उरण या रेल्वे मार्गाचे देखील उद्घाटन होऊ शकते असा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे.
यामुळे जर 12 जानेवारीला या प्रकल्पाचे उद्घाटन झाले तर निश्चितच उरणकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार 12 जानेवारीला या प्रकल्पाचे उद्घाटन करण्याबाबत रेल्वे प्रशासनाने पंतप्रधान कार्यालयाला प्रस्ताव पाठवला आहे.
मात्र अद्याप पंतप्रधान कार्यालयाच्या माध्यमातून याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे पंतप्रधान महोदयांच्या व्यस्त कार्यक्रमातून या प्रकल्पाच्या लोकार्पणासाठी वेळ मिळेल का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे. खारकोपर- उरण या रेल्वे मार्गावर गव्हाण, रांजणपाडा, न्हावा शेवा, द्रोणागिरी आणि उरण ही पाच रेल्वे स्थानके आहेत.
हा रेल्वे मार्गाचा दुसरा टप्पा 14.6 किलोमीटर लांबीचा आहे. या रेल्वे मार्गामुळे उरणकरांना थेट सीएसएमटी पर्यंत लोकलने पोहोचता येणार आहे. दरम्यान हा प्रकल्प या चालू महिन्यातच सुरू होऊ शकतो अशी आशा आता व्यक्त होऊ लागली आहे.