Maharashtra New Railway : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये रेल्वे वाहतूक आणि रस्ते वाहतूक सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न केले गेले आहेत. मात्र असे असले तरी आजही राज्यात असे अनेक रेल्वे मार्ग आहेत जे की गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. या रेल्वे मार्गांची कामे अजूनही पूर्ण झालेली नाहीत.

त्यामध्ये लातूर आणि नांदेड जिल्ह्यातील रेल्वे प्रकल्पांचा देखील समावेश आहे. आता मात्र मराठवाड्यातील या दोन्ही जिल्ह्यांमधील महत्त्वाचे रेल्वे प्रकल्प पूर्णत्वास जाणार आहेत. कारण की या दोन्ही जिल्ह्यातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रेल्वे मार्गाच्या अंतिम सर्वेक्षणास नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे.

बोधन-बिदर व नांदेड-लोहा लातूरसह बोधन-मुखेड लातूर नवीन रेल्वेमार्गाच्या अंतिम सर्वेक्षणास रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली असल्याची माहिती समोर आली आहे. नांदेड-बिदर या नव्या रेल्वे मार्गासाठी 750 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद देखील करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बोधन – बिदर, नांदेड – लोहा – लातूर, बोधन- मुखेड – लातूर या तीन नवीन रेल्वे मार्गाचे अंतिम सर्वेक्षण लवकरच पूर्ण होणार आहे. या मार्गांचे सर्वेक्षण करण्यासाठी नुकतेच आदेश देण्यात आले आहेत. रेल्वे मंत्र्याच्या सहायक बोर्डाचे संचालकांनी मध्य रेल्वेच्या जनरल मॅनेजरला अंतिम सर्वे करण्याचे आदेश दिले आहेत.

त्यामुळे जवळपास तीन ते साडेतीन दशकांपासून प्रलंबित असलेला या रेल्वे मार्गांचा मुद्दा आता निकाली निघेल आणि मराठवाड्यातील जनतेला जलद गतीने रेल्वे प्रवास करता येईल अशी आशा व्यक्त होत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, बोधन-बिदर या 114 कि.मी. नव्या रेल्वे मार्गासाठी 285.25 कोटी रुपयाचा निधी रेल्वे बोर्डाने मंजूर केला आहे.

तसेच नांदेड – लोहा – लातूर या 103 कि.मी. नव्या रेल्वे मार्गासाठी 275.95 कोटी रुपयांचा निधीही रेल्वे बोर्डाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान आता आपण लातूर-नांदेड ब्रॉड गेज रेल्वे मार्ग आणि नांदेड – देगलूर – बिदर ब्रॉडगेज रेल्वे मार्गाचे रूट मॅप थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

नांदेड – देगलूर – बिदर ब्रॉडगेज रेल्वे : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित हा ब्रॉड गेज रेल्वेमार्ग मराठवाड्यातील विकासाला एक नवीन दिशा देण्याचे काम करणार आहे. हा 157 किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग असेल. यापैकी 100.75 किलोमीटर लांबीचा मार्ग आपल्या महाराष्ट्रात असेल आणि उर्वरित मार्ग हा कर्नाटकात राहणार आहे.

यामुळे बिदर ते नांदेड हा प्रवास जलद होणार आहे. या रेल्वेमार्गात 14 स्टेशन विकसित होणार आहेत. या प्रकल्पासाठी 1500 कोटी रुपयांपेक्षा अधिकचा खर्च होणार आहे. यापैकी 50% निधी हा राज्य शासनाकडून उपलब्ध करून दिला जाणार आहे.

लातूर – नांदेड ब्रॉडगेज रेल्वे : मराठवाड्यातील आणखी एक महत्त्वाचा आणि गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असलेला रेल्वे मार्ग आहे. या रेल्वेमार्गाची एकूण लांबी 103 किलोमीटर एवढी आहे. या रेल्वे मार्गासाठी तीन हजार बारा कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

याशिवाय वर्धा, यवतमाळ वरूनही ब्रॉडगेज रेल्वे नांदेड पर्यंत येणार आहे. हा लातूर मार्गे मुंबईला जाण्यासाठी महत्त्वाचा रेल्वे मार्ग राहील. त्यामुळे मराठवाड्याचा एकात्मिक विकास सुनिश्चित होणार आहे. 

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *