Maharashtra New Expressway : गेल्या काही वर्षांमध्ये राज्यात विविध विकास कामे पूर्ण झाली आहेत. रस्ते विकासाची विविध प्रकल्प गेल्या काही वर्षांमध्ये पूर्ण झाली असून यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आधीच्या तुलनेत आणखी मजबूत झाली आहे. अशातच मुंबई ते नाशिक दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे.
ती म्हणजे राष्ट्रीय महामार्ग 3 वर अर्थातच मुंबई ते नाशिक राष्ट्रीय महामार्गावर राज्यातील सर्वाधिक लांबीचा एलिव्हेटेड रोड तयार होणार आहे. या नॅशनल हायवेवर ठाणे ते पडघा दरम्यान एलिव्हेटेड रोड तयार केला जाणार आहे.
खरंतर मुंबईहून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा फटका बसत आहे. यामुळे मुंबई ते नाशिक हा प्रवास खूपच किचकट बनला आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची देखील भीती व्यक्त होत आहे. हेच कारण आहे की या मार्गावर तीस किलोमीटर लांबीचा एलिव्हेटेड रोड तयार करण्याची योजना हाती घेण्यात आली आहे.
दरम्यान हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबईहून शिर्डी किंवा नाशिककडे जाणाऱ्या वाहनांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागणार नसल्याची आशा व्यक्त होत आहे. या राज्यातील अतिशय महत्त्वाच्या अशा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूकीची समस्या संपवण्यासाठी सरकारने ठाणे ते पडघा दरम्यान 30 किलोमीटर लांबीचा उन्नत रस्ता तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.
खरे तर मुंबई, पुणे आणि नासिक ही राज्याच्या विकासाची सुवर्ण त्रिकोण आहेत. या शहरांवरूनच खऱ्या अर्थाने राज्याचा विकास मोजला जातो असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. दरम्यान, मुंबईहून नाशिक प्रवास करण्यासाठी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
या दोन्ही शहरादरम्यानचा प्रवास हा खूपच आव्हानात्मक बनला आहे. परिणामी ठाण्यात हा एलिव्हेटेड रोड बांधला जाणार आहे. हा राज्यातील सर्वाधिक लांबीचा एलिव्हेटेड रोड राहणार आहे. हा रोड मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) तयार करणार आहे.
विशेष म्हणजे प्राधिकरणाने या उन्नत रस्त्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. डीपीआर तयार करण्यासाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सध्याच्या रस्त्यावर येत्या काही महिन्यांत रस्ता तयार करण्याचा आराखडा तयार केला जाणार आहे.
हा उन्नत रस्ता तयार करण्याची गरज का भासली?
वास्तविक, समृद्धी महामार्ग हा भिवंडी जवळ मुंबई-नाशिक हायवेला कनेक्ट होणार आहे. अशा स्थितीत संपूर्ण समृद्धी महामार्ग खुला झाल्याने राष्ट्रीय महामार्ग-३ आणि समृद्धी महामार्गाची वाहने एकत्र आल्याने ठाण्याजवळील वाहतुकीची समस्या आणखी वाढणार आहे. यामुळे ही संभाव्य वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी सरकारने या दिशेने काम करण्याचा निर्णय घेतला आहे.
जेणेकरून ठाण्याच्या पलीकडे समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी वाहनांना कोणत्याही प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागणार नाही. हा 30 किलोमीटर लांबीचा उन्नत रस्ता तयार झाल्यानंतर वाहनांना पडघा ते ठाण्यादरम्यान जलद गतीने जाता येणार आहे. दुसरीकडे ईस्टर्न एक्स्प्रेस वेचा विस्तार ठाण्यातील आनंद नगरपर्यंत करण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे.
परिणामी या प्रस्तावित एलिव्हेटेड रोडवरून उतरून प्रस्तावित ईस्टर्न एक्स्प्रेस वेच्या विस्तारावरून प्रवास करून प्रवासी सहजपणे दक्षिण मुंबईत पोहोचू शकतात. यामुळे भविष्यात मुंबई शहरासह उपनगरातील वाहतूक कोंडी बऱ्यापैकी नियंत्रणात येणार आहे. यामुळे मुंबई ते नाशिक हा प्रवास जलद होणार आहे.