Maharashtra Hill Stations : या विकेंडला तुम्ही फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी महाराष्ट्रातील काही हिल स्टेशन्स सर्वोत्तम ठरू शकतात. महाराष्ट्रातील काही हिल स्टेशन्स तुम्हाला नैसर्गिक आनंद देऊ शकतात. या हिल स्टेशनला तुमच्या कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत भेट देऊ शकता.
महाबळेश्वर
महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण आहे. महाबळेश्वर हे एक प्रसिद्ध हिल स्टेशन्सपैकी आहे. या ठिकाणचे नयनरम्य दृश्य आणि नैसर्गिक वातावरण तुम्ही पाहू शकता. तसेच या ठिकाणी तुम्ही स्ट्रॉबेरीचा आनंद घेऊ शकता.
खंडाळा
खंडाळ्यामध्ये अनेक प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत. खंडाळ्यात तुम्ही गुहा, किल्ले आणि धबधबे, सूर्यास्त आणि सूर्योदयाचे सुंदर दृश्य पाहू शकता. मे ते ऑक्टोबर दरम्यानच्या काळात तुम्ही या ठिकाणी फिरायला जाऊ शकता.
चिखलदरा
महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात चिखलदरा हे एक प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. या हिल स्टेशनला भेट देण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक येत असतात. येथे तुम्ही भीमकंद, गाविलगड किल्ला, पंचबोल आणि देवी पॉइंट सारख्या ठिकाणांना भेट देऊ शकता.
लोणावळा
लोणावळा हे एक महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे. या ठिकाणी हिल स्टेशनचा आनंद घेण्यासाठी पावसाळ्यात अनेक लोक येत असतात. तसेच पावसाळ्यामध्ये या ठिकाणी हिरवळीचे नैसर्गिक वातावरण पाहण्यासाठी अनेक लोक या ठिकाणी पाहायला जाण्याचा प्लॅन करत असतात.
कोरोली
नाशिकपासून 150 किलोमीटर अंतरावर कोरोली हे एक प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. या ठिकाणी तुम्ही शांत नैसर्गिक वातावरण आणि सुंदर दृश्य पाहू शकता. पावसाळ्यामध्ये तुम्ही या ठिकाणी भेट देऊ शकता.