Maharashtra Government Job : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. विशेषता ज्यांना न्यायालयात नोकरी करण्याची इच्छा असेल अशा तरुणांसाठी ही बातमी खास राहणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बॉम्बे हायकोर्टाने राज्यातील काही जिल्हा न्यायालयांमधील लघुलेखक, कनिष्ठ लिपिक आणि शिपाई या रिक्त पदांसाठी भरती आयोजित केली आहे. यासाठीची अधिसूचना देखील बॉम्बे हायकोर्टने निर्गमित केली आहे.
सदर अधिसूचनेनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांना लवकरात लवकर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यामुळे जर तुम्हीही या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असाल तर तुम्हालाही लवकरात लवकर यासाठी अर्ज करायचा आहे. तत्पूर्वी आपण या भरतीची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणत्या आणि किती पदांसाठी होणार भरती ?
या पदभरती अंतर्गत शिपाई पदाच्या १,२६६ जागा,
कनिष्ठ लिपिक पदाच्या २,७९५ जागा आणि लघुलेखक पदाच्या ५६८ जागा भरणे प्रस्तावित आहे. म्हणजेच एकूण 4629 जागा या भरतीच्या माध्यमातून भरणे प्रस्तावित आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता
या भरतीअंतर्गत भरल्या जाणाऱ्या विविध पदांसाठीची शैक्षणिक पात्रता पदानुसार भिन्न राहणार आहे. यामुळे शैक्षणिक पात्रतेबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी एकदा अधिसूचना वाचणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या भरतीसाठी 18 ते 38 वर्षे वयोगटातील उमेदवार पात्र राहणार आहेत. तथापि जे राखीव प्रवर्गातील उमेदवार असतील त्यांना नियमानुसार या ठिकाणी वयोमर्यादेत सूट दिली जाणार आहे.
किती फि लागणार
या भरतीसाठी सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना एक हजार रुपये आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांना 900 रुपये फी लागणार आहे.
किती पगार मिळणार
या भरती अंतर्गत नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना पदानुसार 15 हजार रुपयांपासून ते एक लाख 22 हजार 800 रुपयांपर्यंतचे वेतन मिळणार आहे.
अर्ज कसा करावा लागणार https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32755/85887/Index.html या अधिकृत संकेतस्थळावर या भरतीसाठी अर्ज सादर करता येणार आहे.
अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिनांक
या भरतीसाठी 18 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. विहित कालावधीनंतर उमेदवारांना अर्ज सादर करता येणार नाही यामुळे लवकरात लवकर या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अर्ज करावा लागणार आहे.