Maharashtra Ghat : महाराष्ट्रासहित देशातील विविध राज्यांमध्ये विविध महामार्गांची कामे सुरू आहेत. शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून रस्ते वाहतूक सुधारण्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. प्रशासनाच्या माध्यमातून काही नवीन महामार्ग तयार केले जात आहेत तर काही ठिकाणी सध्याच्या मार्गाच्या विस्तारीकरणाचे काम सुरू आहे.
महाड ते पुणे या 120 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे विस्तारीकरणाचे देखील काम केले जात आहे. हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आल्याने याचे विस्तारीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. या मार्गावरील वरंधा घाट हा रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडतो.
दरम्यान या घाट मार्गात सध्या दुपदरीकरणाचे आणि संरक्षक भिंती उभारण्याचे काम सुरु आहे. यामुळे वरंध घाट वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. एक एप्रिल ते 30 मे 2024 पर्यंत हा घाट मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
खरंतर या घाट मार्गातील कामे वाहतूक सुरू असताना करणे रिस्की झाले असते. यामुळे अपघात होण्याची भीती होती. शिवाय काम देखील जलद गतीने झाले नसते. यामुळे हा घाट मार्ग 30 मे 2024 पर्यंत बंद करण्याचा निर्णय झालेला होता.
परंतु सध्या स्थितीला उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत. लग्नसराई आणि सणासुदीचा हंगाम आहे. दहा मे ला अक्षय तृतीयाचा मोठा सण आहे. शिवाय निवडणुकीचा देखील काळ सुरू आहे.
अशातच हा घाट मार्ग बंद करण्यात आला असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. हेच कारण आहे की प्रशासनाच्या माध्यमातून आगामी आठ दिवसांसाठी हा घाट मार्ग पुन्हा एकदा सुरू करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार वरंध घाट मार्ग आता आठ मे 2024 पर्यंत वाहतुकीसाठी सुरू राहणार आहे. हा घाट मार्ग आजपासून अर्थातच एक मे पासून वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. परंतु आठ मे नंतर पुन्हा एकदा हा घाट मार्ग वाहतुकीसाठी बंद होणार आहे.