Maharashtra Favorite Hill Station : आज जानेवारी महिन्याचा शेवटचा दिवस. आज महिना अखेर आहे. उद्यापासून फेब्रुवारी महिन्याची सुरुवात होणार आहे. खरे तर फेब्रुवारी मधील वातावरण हे पर्यटनासाठी खूपच खास असते. यामुळे दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात लाखोंच्या संख्येने पर्यटक पर्यटन स्थळांवर गर्दी करत असतात.
यंदाही फेब्रुवारीमध्ये पर्यटन स्थळांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी महिन्यातील गोड गुलाबी थंडी पर्यटकांना पर्यटनासाठी साद घालत असते. यामुळे आज आपण फेब्रुवारी महिन्यात भटकंती करण्याजोग्या एका प्रसिद्ध हिल स्टेशनची माहिती जाणून घेणार आहोत.
खरे तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळांचा जेव्हा विषय निघतो तेव्हा माथेरानचे नाव सर्वात आधी घेतले जाते. माथेरान हे महाराष्ट्रातील सर्वात छोटे आणि सुंदर हिल स्टेशन आहे यात शंकाच नाही. मात्र आज आपण ज्या हिल स्टेशनची माहिती जाणून घेणार आहोत ते माथेरान नंतर दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात लहान आणि अतिशय मनमोहक निसर्गरम्य हिल स्टेशन आहे.
हे ठिकाण पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे. मात्र अनेकांना अजूनही याची माहिती नाहीये. आम्ही ज्या हिल स्टेशन बाबत बोलत आहोत ते हील स्टेशन आहे तोरणमाळ. तोरणमाळ हे राज्यातील खानदेश मधील एक प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण आहे. नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात हे पर्यटन स्थळ वसलेले आहे.
या ठिकाणाला लाभलेले नैसर्गिक सौंदर्य शब्दात वर्णनासारखे नाहीये. तुम्ही जर इथे गेलात तर तुम्हाला नक्कीच चांगला अनुभव मिळणार आहे. तुमची तोरणमाळ ट्रिप मनाला अमाप आनंद देऊन जाणार आहे. हे ठिकाण समुद्रसपाटीपासून ११४३ मीटर उंचीवर वसलेले आहे. येथे महाराष्ट्रातील पर्यटक तर मोठ्या प्रमाणात येतात शिवाय गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यातील पर्यटक देखील आवर्जून हजेरी लावत असतात.
येत्या फेब्रुवारीत देखील असंख्य पर्यटक या ठिकाणी भेट देणार आहेत. जर तुमचाही फेब्रुवारी महिन्यात एखाद्या थंड हवेच्या ठिकाणाला भेट देण्याचा बेत असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी परफेक्ट ठरू शकते. सध्या तोरणमाळ येथे गुलाबी थंडीची चाहूल पाहायला मिळत आहे. यामुळे या ठिकाणाचे सौंदर्य आणखी वाढले आहे. येथील नजारा हा स्वर्गापेक्षा कमी नाही.
सातपुडा पर्वतरांगांमधील हे पर्यटन स्थळ आजही जशाच्या तसेच आहे. अनेकांना या पर्यटन स्थळांची माहिती नसल्याने याचे सौंदर्य आजही अबाधित राहिलेले आहे. सुरुवातीला येथे दळणवळण व्यवस्था नव्हती आता मात्र दळणवळण व्यवस्था चांगली झाली आहे. येथे पोहोचण्यासाठी डोंगराला तब्बल सात फेऱ्या माराव्या लागतात आणि त्यानंतर तोरणमाळ गाठता येते.
येथील सूर्योदय आणि सूर्यास्त पाहण्यासारखे राहते. येथील सीताखाई पॉईंट हा विशेष प्रसिद्ध आहे. ही एक मोठी दरी आहे. या दरीच्या पुढेच एक सुंदर असा धबधबा आहे. येथील यशवंत तलाव देखील पाहण्यासारखा आहे. हा एक नैसर्गिक तलाव आहे म्हणजेच आपोआप तयार झालेला तलाव आहे. हा तलाव कोणीच बांधलेला नाही.
या तलावाची मोठी विशेषता म्हणजे येथे बारा महिने तुम्हाला पाणी पाहायला मिळते. या तलावात फिरण्यासाठी तुम्हाला स्वयंचलित बोट देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. येथे भेट देण्यासाठी ऑक्टोबर ते मे हा कालावधी सर्वोत्कृष्ट असतो. या आठ महिन्यांच्या कालावधीत तुम्ही कधीही या ठिकाणाला भेट देऊ शकता.
फेब्रुवारीत सुद्धा या ठिकाणी भेट दिली जाऊ शकते. येथे रेल्वेने जायचे असेल तर नंदुरबार आणि दोंडाई ही जवळची रेल्वे स्थानके आहेत. तसेच येथे तुम्ही लाल परीने देखील जाऊ शकता. धुळे, नंदुरबार आणि शहादा येथून तुम्हाला तोरणमाळसाठी बस मिळून जाईल. येथे रिसॉर्ट आणि होम-स्टेची सुविधा आहे.