Maharashtra Famous Tourist Spot : फिरायला कोणाला नाही आवडत ? क्वचितच असा व्यक्ती असेल ज्याला भटकंती करणे आवडत नाही. आपल्यापैकी अनेकजण निसर्गाच्या सानिध्यात जाऊन आपल्या धकाधकीच्या आयुष्यातुन सवड काढून काही क्षण सुखात घालवण्याचा प्रयत्न करत असतात.

दरम्यान फेब्रुवारी महिना येत्या काही दिवसात समाप्त होणार आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही या महिन्याच्या शेवटी कुठे बाहेर फिरण्यासाठी जाणार असाल तर तुमच्यासाठी आजचा हा लेख खूपच उपयुक्त ठरणार आहे.

कारण की आज आपण महिणन्याअखेरीस भटकंतीसाठी बेस्ट ठरणाऱ्या काही प्रसिद्ध पर्यटन स्थळांची माहिती जाणून घेणार आहोत. खरे तर महाराष्ट्रात अशी हजारो पर्यटन स्थळे आहेत जी एक्सप्लोर केली जाऊ शकतात.

दरम्यान आज आपण सातारा जिल्ह्यातील काही प्रसिद्ध पर्यटन स्थळांची माहिती जाणून घेणार आहोत. यामुळे जर तुम्ही नजीकच्या काळात कुठे फिरायला जाणार असाल तर या प्रसिद्ध पर्यटन स्थळांना भेट देऊ शकता.

प्रतापगड : हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांनी ज्या दुर्गावर अफजलखानाचा वध केला होता तोच हा प्रतापगड. या किल्ल्याला लाभलेले ऐतिहासिक महत्त्व पाहता येथे दुर्गप्रेमी मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. जर तुम्हालाही छत्रपती शिवप्रभूंचा इतिहास जवळून पाहायचा असेल तर सातारा जिल्ह्यातील किल्ले प्रतापगड येथे तुम्ही नक्कीच भेट दिली पाहिजे.

ठोसेघर धबधबा : सातारा शहरापासून अवघ्या काही किलोमीटरच्या अंतरावर वसलेला हा धबधबा पर्यटकांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. जर तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात जाऊन क्वालिटी टाईम स्पेंड करायचा असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी बेस्ट ठरणार आहे. तुम्ही तुमच्या मित्रपरिवारासमवेत या ठिकाणी नक्कीच भेट द्या.

सज्जन गड : सातारा जिल्ह्यातील एक प्रसिद्ध दुर्ग म्हणून सज्जनगडाची ओळख आहे. येथे अनेक दुर्गप्रेमी गर्दी करत असतात. राज्यातील कानाकोपऱ्यातील पर्यटक येथे येतात. तुम्ही सकाळी पाच ते रात्री नऊ या कालावधीत येथे जाऊ शकता.

चाळकेवाडी पवनचक्की : जर तुम्ही तुमच्या परिवारातील लहानग्यांसोबत कुठे ट्रिप काढत असाल तर तुमच्यासाठी सातारा जिल्ह्यात असलेले हे ठिकाण सर्वोत्कृष्ट ठरणार आहे.

कास पठार : सातारा जिल्ह्यातील सर्वात सुंदर ठिकाण. पर्यटकांची नियमित वर्दळ राहणारे आणि रंगीबेरंगी आकर्षक फुलांची सजावट असलेले कास पठार पर्यटकांमध्ये खूपच लोकप्रिय आहेत. कास पठारावर पर्यटकांची नियमित गर्दी पाहायला मिळते.

सातारा शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर आणि सुप्रसिद्ध महाबळेश्वर येथून 25 किलोमीटर अंतरावर वसलेले हे पठार तुम्ही नक्कीच एक्सप्लोर केले पाहिजे. परिवारासमवेत, परिवारातील लहानग्यांसोबत आणि मित्रपरिवारासमवेत तुम्ही येथे भेट देऊ शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *