Maharashtra Famous Tourist Spot : तुमचाही उन्हाळी सुट्ट्यांमध्ये कुठे पिकनिकला जाण्याचा प्लॅन आहे का ? शिमला, कुल्लू, मनाली येथे ट्रिप काढण्याच्या तयारीत आहात का ? अहो मग थांबा ट्रीपच्या आधी हा लेख वाचाच. खरे तर दरवर्षी महाराष्ट्रातील पर्यटक मोठ्या प्रमाणात शिमला, कुल्लू, मनाली या ठिकाणी भेटी देतात.

मात्र जर तुम्हाला शिमला, कुल्लू, मनाली येथे जाणे जमत नसेल तर तुमच्यासाठी आज आम्ही महाराष्ट्रातील फेवरेट पिकनिक स्पॉटची माहिती घेऊन आलो आहोत. या पिकनिक स्पॉटला गेलात तर तुम्हाला शिमला सारखाच फील येणार आहे. महाराष्ट्रात फिरण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत.

देश विदेशातील अनेक पर्यटक आपल्या महाराष्ट्रात येतात. लोणावळा, खंडाळा, महाबळेश्वर, पाचगणी, आंबोली अशा विविध ठिकाणी पर्यटक गर्दी करतात. पण आज आपण महाराष्ट्रातील अशा एका ऑफ बिट टूरिस्ट डेस्टिनेशन बाबत जाणून घेणार आहोत ज्याची माहिती फारच कमी लोकांना आहे.

कोणते आहे ते ठिकाण

आम्ही ज्या टुरिस्ट डेस्टिनेशन बाबत बोलत आहोत ते ठिकाण आहे कोकणातलं. कोकणातील मालवण हे डेस्टिनेशन थोडेसे ऑफबिट डेस्टिनेशन म्हणून ओळखलं जातं. तथापि अनेकजण या ठिकाणी पर्यटनासाठी येतात. येथेही मोठ्या प्रमाणात गर्दी होते.

जर तुमचाही उन्हाळी सुट्ट्या स्पेंड करण्यासाठी कुठे बाहेर जाण्याचा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी कोकणातील मालवण हे एक बेस्ट ऑप्शन ठरणार आहे. दरम्यान आता आपण मालवण मध्ये फिरण्यासारखे कोणकोणते स्पॉट आहेत याविषयी माहिती पाहणार आहोत. 

मालवण बीच : मालवण मध्ये गोव्यासारखेच बीच आहेत. मालवण बीच हा त्यातलाच एक. मालवणला लाभलेला हा समुद्रकिनारा त्याचे सौंदर्य आणखी वाढवतो. मालवण बीच वरील समुद्रातील चमकदार पांढरी वाळू आणि निळे पाणी तुम्हाला नक्कीच मंत्रमुग्ध करणार ठरणार आहे.

येथील समुद्रकिनाऱ्यालगत असलेली नारळ आणि काजूची झाडे याच सौंदर्य आणखी वाढवतात. हा समुद्रकिनारा खूपच स्वच्छ आहे.

सिंधुदुर्ग किल्ला : मालवण करण्यासाठी केला तर मालवणपासून अगदी हाकेच्या अंतरावर वसलेला सिंधुदुर्ग किल्ला देखील नक्कीच एक्सप्लोर करा. 48 एकरावर पसरलेला हा किल्ला पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करतो.

रॉक गार्डन : मालवण मधील रॉक गार्डन देखील पर्यटकांमध्ये एक आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. या गार्डनमध्ये सूर्यास्ताच्या वेळी आणि सूर्योदयाच्या वेळी मोठ्या प्रमाणात पर्यटक हजेरी लावतात.

येथे सूर्यास्त आणि सूर्योदयाच्या वेळी खूपच अल्हाददायक वातावरण अनुभवायला मिळते. या गार्डनची नयनरम्य सुंदरता तुमच्या मनाला नक्कीच आनंद देणार आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *