Maharashtra Famous Tourist Spot : उन्हाळा सुरू झाला की पर्यटकांचे पाय आपोआप पर्यटन स्थळांकडे वळू लागतात. उन्हाळ्यात पर्यटनाची मजाच काही खास असते. यामुळे, उन्हाळ्याच्या सुट्टीत अनेक जण पिकनिकचा प्लॅन बनवत असतात. वाढत्या उकाड्यापासून दिलासा मिळावा आणि धकाधकीच्या आयुष्यातून थोडासा वेळ शांत आणि निवांत परिसरात घालवता यावा यासाठी अनेकजण हिल स्टेशनला भेटी देतात.
हिल स्टेशनचा विषय निघाला तर सर्वप्रथम लोणावळा आणि खंडाळ्याचे नाव ओठांवर येते. मात्र महाराष्ट्रात लोणावळा खंडाळा, महाबळेश्वर, भीमाशंकर या प्रसिद्ध हिल स्टेशन शिवाय अशी अनेक ठिकाणी आहेत जिथे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये भेट देता येते.
दरम्यान आज आपण विदर्भातील अशाच एका प्रसिद्ध हिल स्टेशन ची माहिती जाणून घेणार आहोत. जर तुम्ही ही नजीकच्या भविष्यात पिकनिकसाठी बाहेर पडणार असाल तर विदर्भातील हे हिल स्टेशन तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरणार आहे. येथील नैसर्गिक सौंदर्य तुम्हाला भारावून सोडणार आहे.
कोणते आहे ते ठिकाण
आम्ही ज्या ठिकाणाबाबत बोलत आहोत ते आहे विदर्भातीलच चिखलदरा हे ठिकाण. चिखलदरा हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. येथे देश-विदेशातील पर्यटक हजेरी लावत असतात. हे ठिकाण सुंदर तलाव, धार्मिक स्थळे यांसाठी विशेष प्रसिद्ध आहे.
चिखलदऱ्याला गेलात तर येथील पंचबोल पॉइंटला नक्कीच विजिट करा. येथून चिखलदऱ्याचे नैसर्गिक सौंदर्य उघड्या डोळ्याने टिपता येते. या पंचबोल पॉईंट च्या आजूबाजूला कॉफीचे मळे पाहायला मिळतात. येथील डोंगराळ दृश्य तुमच्या मनाला मंत्रमुग्ध करणार एवढे नक्की.
तसेच चिखलदरा येथील गुगामल राष्ट्रीय उद्यान देखील पर्यटकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. हा नॅशनल पार्क खूपच खास असून तुम्हाला येथे वेगवेगळे वन्यजीव पाहायला मिळतील. हरीण, बिबट्या, सिंह असे अनेक प्राणी तुम्ही येथे पाहू शकता.
निसर्गप्रेमींसाठी हे ठिकाण खूपच भन्नाट आहे. येथील भीम कुंड हे आणखी एक प्रसिद्ध ठिकाण आहे. डोंगराच्या मधोमध एक तलाव असून या तलावाला भिमकुंड म्हणून ओळखले जाते. चिखलदरा हे ठिकाण अमरावती रेल्वे स्टेशन पासून शंभर किलोमीटर वर आहे.
तसेच नागपूर विमानतळापासून हे ठिकाण 240 किलोमीटरवर आहे. या ठिकाणी तुम्हाला राहण्यासाठी अनेक हॉटेल्स उपलब्ध होतात. माफक दरात चांगल्या सोयी सुविधा असणाऱ्या हॉटेल्स तुम्हाला येथे भेटणार आहेत.