Maharashtra Famous Tourist Destination : महाराष्ट्रात पर्यटनासाठी अनेक ठिकाणे तुम्हाला पाहायला मिळतील. बाराही महिने राज्यातील पर्यटन स्थळांवर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. विशेषता पावसाळ्यात राज्यातील प्रमुख पर्यटन स्थळांवर पर्यटकांची रेलचेल असते.

दरम्यान, येत्या काही दिवसात देशात मान्सूनचे आगमन होणार आहे. जून महिन्यात पावसाळ्याला सुरुवात होणार आहे. यामुळे अनेक जण जून महिन्यात पर्यटनासाठी बाहेर पडणार आहेत.

अशा परिस्थितीत आज आपण कोकणातील एका प्रसिद्ध पर्यटन स्थळाची माहिती जाणून घेणार आहोत. आज आपण ज्या पर्यटन स्थळाची माहिती पाहणार आहोत तिथे दिवसभरातून फक्त 30 मिनिटे फिरता येते.

या ठिकाणी नदी आणि समुद्र एकरूप होत असतात. येथे नदी समुद्राला मिळते. येथून तुम्हाला मंत्रमुग्ध करणारा नजारा पाहायला मिळणार आहे. येथे जमिनीचे एक निमूळते टोक आहे जे की समुद्र व नदीच्या मिलनाचा दुवा आहे.

नदी व समुद्राचा संगम तयार होऊन येथे एक सुंदर बेट तयार झाले आहे. संगम सिंगल बेट असे या बेटाचे नाव आहे. देवाबाग समुद्रकिनारा हा सीगल संगम साठी प्रसिद्ध आहे. हे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे.

देवबाग समुद्र किनारा मालवण पासून 12 किलोमीटर अंतरावर आणि तारकर्ली पासून अवघ्या सहा किलोमीटरच्या अंतरावर वसलेले आहे. कर्ली नदी आणि अरबी समुद्राचा या ठिकाणी संगम होतो. यामुळे देवबाग समुद्रकिनाऱ्यावर निसर्गाचे अद्भुत सौंदर्य पाहायला मिळते.

या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक हजेरी लावत असतात. दररोज येथे पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. जर तुम्ही कधी कोकणात फिरायला गेलात तर हे ठिकाण नक्कीच एक्सप्लोर करा. जर तुम्हाला येथे जायचे असेल तर तुम्ही रेल्वे मार्गाने तसेच रस्ते मार्गाने या ठिकाणी पोहोचू शकता.

तुम्ही जर कोकण रेल्वेने गेलात तर कुडाळ रेल्वे स्टेशनवर उतरावे लागेल. मग तुम्हाला मालवणला जावे लागणार आहे. मालवण येथून बोटीने प्रवास करून या ठिकाणी जाता येते. जर तुम्ही बस ने जाणार असाल तर मालवण पर्यंत तुम्हाला थेट बस उपलब्ध होते.

मालवण येथून मग बोटीने प्रवास करून तुम्ही या सुंदर अशा पर्यटन स्थळावर भेट देऊ शकता. मात्र या ठिकाणी तुम्हाला दिवसभरात फक्त तीस मिनिटे फिरण्यास परवानगी दिली जाते. महाराष्ट्रातील हे एकमेव असे ठिकाण आहे जिथे फक्त अर्धा तास फिरण्यासाठी मिळतात.

मात्र या तीस मिनिटांमध्ये तुम्ही कोकणाचे खरे सौंदर्य अनुभवू शकता. या जागेचे वर्णन शब्दात करणे थोडे कठीण आहे. प्रत्यक्षात भेट दिल्यास तुम्हाला या जागेची सुंदरता किती अमाप आहे हे समजू शकणार आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *