Maharashtra Famous Tourist : पुरोगामी महाराष्ट्राला लाभलेले ऐतिहासिक महत्व हे शब्दात वर्णनासारखे नाहीये. आपल्या महाराष्ट्राचा फक्त इतिहासच गौरवशाली आहे असे नाही तर महाराष्ट्राला लाभलेले नैसर्गिक सौंदर्य देखील खूपच अप्रतिम आणि वर्णनासारखे आहे.

महाराष्ट्रात फिरण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. दरम्यान या हजारो ठिकाणांपैकी आज आपण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील तीन अतिशय लोकप्रिय पर्यटन स्थळांची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

जर तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत ट्रीप काढण्याचा प्लॅन करत असाल तर तुम्ही सोलापूरला भेट देऊ शकता. राजधानी मुंबईपासून 400 किलोमीटरच्या अंतरावर वसलेले पश्चिम महाराष्ट्रातील हे शहर आणि येथील पर्यटन स्थळे पर्यटकांना भुरळ घालत आहेत.

जर तुम्हालाही तुमची परिवारासमवेत आनंदात घालवायची असेल तर तुम्ही सोलापूर जिल्ह्यातील या तीन फेमस पिकनिक स्पॉटला नक्कीच भेट दिली पाहिजे.

तुळजापूर : सोलापूरला गेलात तर सर्वप्रथम शहरापासून 45 किलोमीटर अंतरावर असलेल्या तुळजापूर येथील आई तुळजाभवानीचे दर्शन घ्या. तुळजापूर येथील हे मंदिर जगप्रसिद्ध आहे. या मंदिरावर दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक गर्दी करत असतात.

जर तुम्हीही तुमच्या फॅमिलीसोबत सोलापूरला ट्रिप काढली असेल तर तुळजापूर मंदिराला नक्कीच भेट दिली पाहिजे.

बागलकोट : सोलापूर पासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या कर्नाटकातील बागलकोट येथे देखील तुम्ही भेट देऊ शकता.

या ठिकाणी तुम्ही तुमच्या परिवारासमवेत गेला तर कॉलिटी टाईम स्पेंड करता येणार आहे. येथील जैन मंदिर, बादामी गुहा हे सारे पाहण्यासारखे आहे.

चंदोली नॅशनल पार्क : सोलापूरला गेलात तर या नॅशनल पार्कला नक्की भेट द्या. सोलापूर हे शहर जैन धर्माचे अध्यात्मिक केंद्र म्हणून ओळखले जाते. मात्र या शहरात फिरण्यासारखे अनेक स्पॉट तुम्हाला दिसतील.

यामध्ये चंदोली नॅशनल पार्क चा देखील समावेश होतो. येथे दरवर्षी हजारोंच्या संख्येने पर्यटक भेटी देत असतात. येथे दररोज पर्यटकांची वर्दळ पाहायला मिळते.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *