Maharashtra Famous Picnic Spot : भारतीय हवामान विभागाने यंदा मान्सूनचे वेळे आधीच आगमन होणार असे म्हटले आहे. मे महिन्याचा पहिला पंधरवडा उलटला आहे. आता खऱ्या अर्थाने मान्सूनची चाहूल लागली आहे. शेतकऱ्यांसहित उकाड्याने हैराण झालेली जनता मान्सूनची आतुरतेने वाट पाहत आहे.
दरम्यान मान्सूनचे आगमन झाल्यानंतर पर्यटक पर्यटन स्थळांवर मोठ्या प्रमाणात गर्दी करणार आहेत. दरवर्षी पावसाळ्यात पर्यटन स्थळांवर पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. येत्या पावसाळ्यात देखील आपल्यापैकी अनेक जण पर्यटनासाठी बाहेर पडणार आहेत.
दरम्यान जर तुमचाही नजीकच्या भविष्यात कुठे पिकनिकसाठी जाण्याचा प्लान असेल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच खास ठरणार आहे. कारण की आज आपण महाराष्ट्रातील काही प्रसिद्ध हिल स्टेशनची माहिती पाहणार आहोत.
कळसुबाई : पावसाळा सुरू झाला की कळसुबाईच्या दिशेने हजारोंच्या संख्येने पर्यटक आपला मोर्चा वळवतात. पावसाळ्यात दरवर्षी या ठिकाणी मोठी गर्दी पाहायला मिळते. महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगांमध्ये सर्वाधिक उंचीचे शिखर म्हणून कळसुबाईला ओळखले जाते.
येथे दरवर्षी मोठ्या प्रमाणात ट्रेकर्स हजेरी लावत असतात. कळसुबाईला बाराही महिने गर्दी असते मात्र पावसाळ्यात या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची संख्या काहीशी वाढत असते. कळसुबाई शिखर महाराष्ट्रातील माउंट एवरेस्ट म्हणून ओळखले जाते.
इगतपुरी मध्ये वसलेले हे ठिकाण निसर्गप्रेमींसाठी खूपच खास आहे. जर तुम्हीही यंदाच्या पावसाळ्यात कुठे ट्रेकिंगसाठी जाणार असाल तर कळसुबाई शिखर तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरणार आहे. या ठिकाणी तुम्ही वन डे ट्रिपचे आयोजन करू शकता.
कसारा घाट : कासारा घाट त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी पर्यटकांमध्ये आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. इगतपुरी जवळील हे ठिकाण पर्यटकांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. पावसाळ्यात कासारा घाटाची सुंदरता आणखीच खुलते.
हिरवाईने नटलेला आणि डोंगरांनी वेढलेला हा घाट स्वर्गापेक्षा कमी नाही. येथील धबधबे, डोंगर, ओढे, नाले सार काही स्वर्गाहून सुंदर आहे. जर तुमचाही येत्या पावसाळ्यात कुठे पर्यटनाला जाण्याचा प्लॅन असेल तर तुम्ही कसारा घाट नक्कीच एक्सप्लोर केला पाहिजे.
भावली धरण : जर तुमचाही येत्या पावसाळ्यात कुठे पिकनिकचा प्लॅन असेल तर इगतपुरी मध्ये असणारे हे भावली धरण तुमच्यासाठी परफेक्ट ठरणार आहे. येथे जाऊन तुम्ही तुमची पिकनिक आनंदात घालवू शकता.
तुम्ही तुमच्या मित्रांसमवेत किंवा परिवारासमवेत भावली धरण एक्सप्लोर करू शकता. येथे गेलात तर येथून जवळच असलेला विहिगाव धबधबा देखील नक्कीच एक्सप्लोर करा.