Maharashtra Famous Picnic Spot : महाराष्ट्रात फिरण्यासाठी हजारो ठिकाणे आहेत. यातील लोणावळा, खंडाळा, महाबळेश्वर, पाचगणी अशा ठिकाणी पर्यटकांची नेहमीच वर्दळ पाहायला मिळते. पर्यटक अशा ठिकाणी बारा महिने गर्दी करतात. मात्र आज आपण अशा काही पर्यटन स्थळांची माहिती जाणून घेणार आहोत ज्याविषयी खूपच कमी लोकांना माहिती असेल.

खरंतर, सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत आणि प्रत्येकजण आपल्या सवडीने ट्रीपचे आयोजन करत आहेत. विशेष म्हणजे काही लोकांची उन्हाळी सहल परतली देखील आहे.

पण जर तुम्ही अजून उन्हाळी सहलीला बाहेर पडला नसाल आणि येत्या काही दिवसात ट्रीपचे आयोजन करण्याचा तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी खूपच खास राहणार आहे.

कारण की आज आपण कोकणातील अशा तीन ठिकाणांची माहिती जाणून घेणार आहोत जिथे गेल्यास तुम्हाला कोकणातील नयनरम्य निसर्ग अनुभवता येणार आहे. आज आम्ही तुम्हाला पालघर मधील तीन प्रसिद्ध ठिकाणांची माहिती सांगणार आहोत.

कोणती आहेत ती ठिकाणे

केळवा बीच : जर तुम्ही उन्हाळी सुट्ट्यांमध्ये कुठे पिकनिकला जाण्याच्या तयारीत असाल तर तुम्ही पालघर मधील केळवा बीचला जाऊ शकता. केळवा बीच हे एवढे प्रकाश झोतात आलेले नाही. मात्र असे असले तरी येथे देश आणि विदेशातील पर्यटक येतात.

जो कोणी एकदा या ठिकाणी जातो तो पुन्हा पुन्हा येथे येतो. येथील समुद्रकिनारा हा खूपच सुंदर असून तुम्ही जर उन्हाळी सुट्ट्या स्पेंड करण्यासाठी कुठे बाहेर पडणार असाल तर पालघरला भेट द्या आणि केळवा बीचला नक्कीच जा.

शिरगांव किल्ला : जर तुम्ही पालघरला भेट दिलीच तर येथील शिरगाव किल्ला पाहायला विसरू नका. हा किल्ला दुर्गप्रेमीमध्ये खूपच लोकप्रिय आहे. या किल्ल्यावर स्वराज्य स्थापक छत्रपती शिवरायांनी काही काळ वास्तव्य केले असल्याचे म्हटले जाते. यामुळे या ऐतिहासिक किल्ल्याला भेट द्यायला तुम्ही विसरू नका.

जय विलास पॅलेस : याला जवाहर राजवाडा पॅलेस म्हणूनही ओळखले जाते. हा ऐतिहासिक राजवाडा पर्यटकांमध्ये आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. येथे दररोज शेकडो पर्यटक हजेरी लावत असतात. त्यामुळे तुम्हीही कधी पालघरला गेलात तर येथे भेट द्यायला विसरू नका. 

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *