Maharashtra Famous Picnic Spot : हिवाळा आणि पावसाळा या दोन्ही ऋतूमध्ये पर्यटक पर्यटन स्थळांवर गर्दी करत असतात. सध्या पर्यटनाचा सिझन सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये फिरण्यासारखी अनेक डेस्टिनेशन्स आहेत.
दरम्यान आज आपण राज्यातील अशा काही प्रमुख पर्यटन स्थळांची माहिती पाहणार आहोत जिथे फेब्रुवारी महिन्यात पर्यटकांनी भेट दिल्यास त्यांची ट्रीप फुल टू पैसा वसूल होऊ शकते.
फेब्रुवारी महिना येत्या दोन दिवसात सुरू होणार आहे. जानेवारी महिन्याची उद्या एंडिंग होणार आहे. यामुळे फेब्रुवारीच्या पहिल्या वीकेंडला मोठ्या प्रमाणात पर्यटक फिरण्यासाठी बाहेर पडणार आहेत.
जर तुम्हीही फेब्रुवारीच्या पहिल्या विकेंडला फिरण्यासाठी जात असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी महाराष्ट्रातील काही प्रसिद्ध पर्यटन स्थळांची माहिती घेऊन आलो आहोत.
राज्यातील फेमस पिकनिक स्पॉट
कामशेत : जर तुम्हाला तुमच्या पार्टनर सोबत फेब्रुवारीत कुठे फिरायला जायचे असेल तर कामशेत हा ऑप्शन तुमच्यासाठी बेस्ट ठरणार आहे. कामशेत हा आपल्या लव लाईफ सोबत फिरण्यासाठीचा एक बेस्ट स्पॉट आहे.
येथे गेल्यावर तुम्हाला पॅराग्लायडिंगचा आनंद घेता येणार आहे. तुम्ही नवीन महिन्याची सुरुवात कामशेतला भेट देऊन करू शकता.
पंचगणी : पंचगणी हे थंड हवेचे ठिकाण आहे. येथे तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत किंवा तुमच्या परिवारासमवेत भेट देऊ शकता. मित्रांसमवेत विकेंड एन्जॉय करायचा असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी परफेक्ट राहणार आहे.
कोकण : कोकणात फिरायला अनेक प्रसिद्ध ठिकाण आहेत. तुम्ही येथे तुमच्या जोडीदारासमवेत जाऊ शकता किंवा तुमच्या परिवारासमवेत देखील तुम्ही कोकणात ट्रीप अरेंज करू शकता.
ताडोबा : तुम्हाला जर जंगल सफारीचा आनंद घ्यायचा असेल, वन्य प्राण्यांचे, पशुपक्ष्यांचे दर्शन घ्यायचे असेल तर ताडोबा अभयारण्याला एकदा नक्कीच भेट द्या. ह्या अभयारण्य वाघांसाठी रिझर्व आहे. यामुळे तुम्हाला येथे वाघोबाचे देखील दर्शन होऊ शकणार आहे.
कर्जत : तुम्हाला जर तुमच्या जोडीदारासमवेत एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी स्टे करायचा असेल तर कर्जतचा पर्याय तुमच्यासाठी बेस्ट राहणार आहे. येथे खूप सुंदर-सुंदर रिसॉर्ट आहेत. यामुळे येथे तुम्ही तुमच्या पार्टनर समवेत क्वालिटी टाईम स्पेंड करू शकणार आहात.