Maharashtra Famous Picnic Spot : महाराष्ट्रात पर्यटनासाठी हजारो ठिकाणे प्रसिद्ध आहेत. यामध्ये कोल्हापूर शहरातही अनेक ठिकाणे पर्यटनासाठी विशेष लोकप्रिय आहेत. कोल्हापूर शहर फिरण्यासाठी जगभरातील पर्यटक या रांगड्या मातीत अवतरत असतात.
पर्यटनाच्या दृष्टिकोनातून कोल्हापूर हे एक महत्त्वाचे शहर बनले आहे. या शहराला दरवर्षी हजारो पर्यटक भेटी देत असतात. जर तुम्हीही कोल्हापूर शहराला भेट देण्याच्या विचारात असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी विशेष कामाची ठरणार आहे.
कारण की आज आपण कोल्हापूर शहरातील काही लोकप्रिय पर्यटन स्थळांची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या बहूमूल्य माहिती विषयी सविस्तर.
पन्हाळा : महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध हिल स्टेशन म्हणून पन्हाळ्याला ओळखले जाते. जर तुम्हीही हिवाळ्याच्या शेवटी शेवटी कुठे पर्यटनासाठी जाण्याच्या तयारीत असाल तर हे ठिकाण तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकते. डोंगरावर वसलेला पन्हाळा किल्ला पर्यटकांना साद घालत आहे. येथे दरवर्षी हजारोंच्या संख्येने पर्यटक येत असतात.
श्री अंबाबाई मंदिर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर हे भाविकांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. या प्राचीन मंदिराला भेटी देण्यासाठी जगभरातील सनातनी लोक कोल्हापूर शहरात येत असतात. जर तुम्हीही कधी कोल्हापूरला गेलात तर प्रथमतः श्री अंबाबाई मंदिरात जाऊन दर्शन घ्या.
ज्योतिबा मंदिर : कोल्हापुरातील आणखी एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ. कोल्हापूर शहरापासून अवघ्या पंधरा किलोमीटरच्या अंतरावर हे मंदिर वसलेले आहे. येथे दररोजच दर्शनासाठी मोठी रांग पाहायला मिळते. संपूर्ण महाराष्ट्रातील भाविक या मंदिरात दर्शनासाठी येत असतात.
रंकाळा तलाव : कोल्हापूर शहरातील आणखी एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ. या ठिकाणी दररोज मोठी गर्दी पाहायला मिळते. पश्चिम महाराष्ट्रात पर्यटनासाठी येणारे बहुतांशी लोक रंकाळा तलाव पाहण्यासाठी येतात. जर तुम्हीही कोल्हापूरला गेलात तर येथील रंकाळा तलावाला एकदा नक्कीच भेट द्या. इथे गेल्यानंतर तुमची ट्रिप खऱ्या अर्थाने पूर्ण होणार आहे.