Maharashtra Famous Hill Station : पावसाळा आणि हिवाळा हे दोन्ही ऋतू पर्यटकांसाठी खूपच फायदेशीर ठरतात. या दोन्ही ऋतूंमध्ये पर्यटन स्थळांवर पर्यटकांची गर्दी ओसांडून वाहते. पावसाळ्यात धबधबे, निसर्ग पाहण्यासाठी आणि हिवाळ्यात हिल स्टेशनला भेट देण्यासाठी पर्यटक गर्दी करतात.
दरम्यान यंदाचा हिवाळा हा जवळपास संपण्याच्या मार्गावर आला आहे. मकर संक्रांति नंतर हळूहळू दिवसाच्या कालावधी वाढत जातो आणि येथून खऱ्या अर्थाने हळूहळू थंडीची तीव्रता कमी होत जाते. येत्या काही दिवसात आता उन्हाचा चटका जाणवू लागणार आहे.
अशा परिस्थितीत जर तुम्ही कुठे ट्रिप काढण्याचा प्लॅन बनवत असाल, विशेषता हिल स्टेशन फिरण्याचा तुमचा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच खास राहणार आहे.
कारण की आज आपण महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय हिल स्टेशनची माहिती अगदी मोजक्या शब्दात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय हिल स्टेशन विषयी.
माळशेज घाट : राज्यातील हे एक लोकप्रिय हिल स्टेशन आहे. तुम्हाला हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये देखील या ठिकाणाची सुंदरता अनुभवायला मिळणार नाही. या ठिकाणावर गेलात की तुम्हाला चहूकडे हिरवळ दिसेल. येथील हिरवळ तुमच्या मनाला नक्कीच प्रसन्न करणारी ठरणार आहे.
येथील धबधबे, टायगर पॉईंट आणि भुशी डॅम तुमच्या ट्रिप चे पैसे वसूल करणार आहेत. या ठिकाणी तुम्हाला विलोभनीय दृश्य पाहायला मिळतील. त्यामुळे जर हिल स्टेशनला फिरण्याचा प्लॅन असेल तर हे ठिकाण सोडून चालणार नाही.
खंडाळा : लोणावळा, खंडाळा, कोल्हापूरचा पन्हाळा…., हे लोकप्रिय गीत महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांची तुम्हाला यादी सादर करते. दरम्यान या मराठी गीतात ज्या खंडाळाचा उल्लेख करण्यात आला आहे ते खंडाळा महाराष्ट्रातील एक प्रमुख हिल स्टेशन आहे. या हिल स्टेशनला नक्कीच भेट दिली पाहिजे. मराठी गीतात उल्लेख केल्याप्रमाणे या ठिकाणी मधुचंद्रिकेसाठी भेट देणाऱ्यांची संख्या देखील खूपच अधिक आहे.
हिवाळ्यात पार्टनर सोबत फिरण्यासाठी हे ठिकाण बेस्ट आहे हे वेगळे सांगायला नको. मात्र तुम्ही जर तुमच्या परिवारासमवेत येत असाल तरी देखील खंडाळा तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरणार आहे. खंडाळा हे पश्चिम घाटात वसलेले ठिकाण. येथील धुक्याच्या दऱ्यां, ड्युक नोज, निसर्गरम्य कार्ला आणि भजा लेण्या या ठिकाणाची सुंदरता वाढवतात. निसर्गरम्य वातावरणाने नटलेले हे हिल स्टेशन पर्यटकांना विशेष आकर्षित करते.
माथेरान : महाराष्ट्रातील आणखी एक लोकप्रिय हिल स्टेशन. जे लोक राज्याबाहेरील आहेत ते महाराष्ट्राला भेट दिल्यानंतर राज्यातील हिल स्टेशन एक्सप्लोर करतात. माथेरान, खंडाळा, माळशेज घाट ही या लोकांच्या यादीतील पहिल्या क्रमांकाची स्थळे असतात. आपल्या राज्यातीलही लाखो लोक दरवर्षी माथेरानला भेट देतात. येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या पाहता माथेरान विदेशातील एखादे ठिकाण भासतं.
या हिल स्टेशनची सर्वात मोठी विशेषता म्हणजे हे आशियातील एकमेव ऑटोमोबाईल फ्री हिल स्टेशन आहे. येथे टॉय ट्रेनचा आनंद घेता येतो. येथील टॉय ट्रेनची राईड ही निश्चितच मनाला सुकून देणारी आहे. घनदाट जंगलात वसलेले हे हील स्टेशन आणि येथील विहंगम दृश्य तुमच्या ट्रीपचे संपूर्ण पैसे वसूल करतील. म्हणून जर तुम्ही एखाद्या फेव्हरेबल हिल स्टेशनच्या शोधात असाल तर हे हिल स्टेशन तुमच्यासाठी उत्कृष्ट ठरणार आहे.