Maharashtra Best Picnic Spot : सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेत. विद्यार्थ्यांना सुट्ट्या लागल्या आहेत यामुळे अनेकांची पाऊले आता पर्यटन स्थळांकडे वळली आहेत. आतापर्यंत अनेकांनी समर स्पेशल ट्रीपचे नियोजन केलेले आहे. तर काहीजण नजीकच्या भविष्यात समर स्पेशल ट्रिपचे आयोजन करणार आहेत.
दरम्यान जर तुम्हीही नजीकच्या भविष्यात उन्हाळी सुट्ट्या स्पेंड करण्यासाठी पिकनिकचा प्लॅन बनवत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच खास राहणार आहे.
कारण की आज आम्ही फॅमिली समवेत किंवा मित्र परिवारासमवेत फिरता येतील अशा महाराष्ट्रातील काही प्रसिद्ध पर्यटन स्थळांची माहिती देणार आहोत. यामुळे जर तुम्हीही यंदाच्या उन्हाळ्यात कुठे ट्रिप साठी निघणार असाल तर या ठिकाणांना तुमच्या ट्रिपमध्ये नक्कीच ऍड करा.
महाबळेश्वर : महाबळेश्वर हे राज्यातील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. येथील निसर्गरम्य वातावरण मनाला अमाप सुख देते. धकाधकीच्या आयुष्यातून थोडासा वेळ काढून येथे गेलात तर तुमची संपूर्ण ट्रीप आनंददायी होणार आहे.
येथे तुम्ही तुमच्या परिवारासमवेत किंवा मित्रांसमवेत जाऊ शकता. हे प्रसिद्ध हनिमून डेस्टिनेशन देखील आहे यामुळे येथे तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेतही नक्कीच जाऊ शकता.
लोणावळा, खंडाळा : हे देखील महाराष्ट्रातील फेवरेट हनिमून डेस्टिनेशन आहे. निसर्गाच्या कुशीत वसलेले हे ठिकाण खूपच मनमोहक आहे. जर तुम्हाला निसर्गाचे सौंदर्य आपल्या नजरेत कैद करायचे असेल तर तुम्ही या ठिकाणी भेट द्यायला गेलेच पाहिजे.
येथे तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत हनिमून ट्रिप आयोजित करू शकता किंवा मग तुम्ही तुमच्या परिवारासमवेत किंवा मित्रांसोबत देखील येथे फिरण्यासाठी जाऊ शकता. या परिसरात अनेक रिसॉर्ट आणि व्हिला आहेत. येथे तुम्हाला क्वालिटी टाईम स्पेंड करता येणार आहे.
माथेरान : तुम्ही मुंबई किंवा पुण्यात वास्तव्याला असाल तर हे ठिकाण तुमच्यासाठी बेस्ट ठरणार आहे. मुंबई आणि पुण्यातील नागरिकांसाठी हे एक बेस्ट पिकनिक स्पॉट आहे. येथे दररोज मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. बाराही महिने या ठिकाणी पर्यटकांची वर्दळ असते.
मुंबई, पुण्यापासून अगदी जवळ हे ठिकाण वसलेले आहे. यामुळे जर तुम्ही मुंबई, पुण्यात राहत असाल आणि सुट्टी मिळत नसेल किंवा वेळ कमी असेल तर माथेरान हा तुमच्यासाठी बेस्ट पर्याय ठरणार आहे. येथे कोणत्याही सिजनमध्ये पर्यटनाचा आनंद लुटता येतो.
अलिबाग : येथे तुम्ही कमी बजेट मध्ये ट्रिप काढू शकता. कोकणातील हे ठिकाण कोकणाची सुंदरता दाखवते. येथे तुम्ही कधी गेलात तर येथे वारंवार जावेसे वाटेल एवढे नक्की. अलिबागच्या समुद्रकिनाऱ्यावर तुम्ही क्वालिटी टाईम स्पेंड करू शकणार आहात. येथे तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत ट्रिपच्या आयोजन केले तर तुम्हाला शांत अन मनमोहक अशा निसर्गरम्य वातावरणात वेळेत सुट्ट्यांचा आनंद घेता आहे.