Liver Damage Symbols Due To Alcohol : देशातील अनेक नागरिक मद्यपान करत असतात. काहीजण शौक म्हणून करतात तर काहींना त्याचे व्यसन जडलेले असते. मात्र दररोज दारूचे सेवन करणे तुमच्या शरीरासाठी हानिकारक आहे. दारूचे सेवन अनेकदा तुमच्यासाठी धोकादायक देखील बनू शकते.
त्यामुळे तुम्हीही दारूचे सेवन करत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. कारण दारूचे सेवन करणे हानिकारक तर आहेच मात्र तुमचा जीव देखील जाऊ शकतो. तसेच सतत दारूचे सेवन केल्याने तुमचे यकृत देखील खराब होऊ शकते.
सततचे दारूचे सेवन तुमच्या यकृतावर परिणाम करत असते. तसेच यकृत खराबी होण्यापूर्वी ते अनेक प्रकारचे संकेत देत असते. त्यामुळे शरीराकडे लक्ष देणे गरजेचे आहे. जर तुम्ही या लक्षणांकडे दुर्लक्ष केले तर तुमचा जीव देखील जाऊ शकतो. दारूचे सेवन तुमचे यकृत देखील निकामी करू शकते तसेच इतर काही लक्षणे देखील दिसू शकतात.
अंतर्गत रक्तस्त्राव
मेंदू मध्ये toxins तयार
मूत्रपिंड निकामी होणे आणि ओटीपोटात द्रव जमा होणे
यकृत कर्करोग
वारंवार संसर्ग होणे
जर अशी लक्षणे तुमच्या शरीरामध्ये दिसून आली तर तुम्ही वेळीच काळजी घेणे गरजेचे आहे. कारण अशी लक्षणे दिसल्यास तुम्ही त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा. तसेच तुमच्या शरीराची चाचणी देखील करून घ्या.
दारूच्या सेवनामुळे यकृत खराब झाल्याची सुरुवातीची चिन्हे आणि लक्षणे
तुम्हाला आजारी असल्यासारखे वाटेल
भूक न लागणे
वजन कमी करण्यास सुरवात होते
तुमची त्वचा आणि डोळे पिवळे होतात
तुमच्या पायाला आणि घोट्याला सूज आल्याचे लक्षात येते
झोपेच्या समस्या दिसतात
गोंधळल्यासारखे वाटते
उलट्या करताना किंवा स्टूलमध्ये रक्त असते
यकृताचे नुकसान टाळण्यासाठी तुम्ही काय करू शकता
जर तुम्हीही दारूचे सेवन करत असाल तर त्वरित ते थांबवा. तुम्हाला वरील लक्षणे दिसल्यास तुम्ही जास्त पाणी प्या. निरोगी आणि पोषक आहार घ्या. तसेच डॉक्टरांचा सल्ला देखील घ्या.