Pune News : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या वर्तुळाकार रस्त्याच्या (रिंग रोड) भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात केली आहे.

त्यानुसार पहिल्या टप्प्यात सोलू ते वाघोली (पुणे-नगर रस्ता) पर्यंतचे काम हाती घेतले आहे. त्यानुसार बाधित शेतकऱ्यांच्या बैठका घेऊन स्थानिकांच्या सहमती घेतल्या आहेत.

पीएमआरडीएच्या प्रस्तावित ८८.१३ किमी लांबीचा रिंगरोड प्रकल्प हाती घेतला आहे. टप्पेनिहाय रस्त्याचे काम करण्यात येणार असून

पुणे- मुंबई एक्स्प्रेस वे ते नगर रस्ता रस्ते रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) रिंगरोडद्वारे जोडला जाईल. त्यामुळे शहरांतर्गत वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.

त्याचप्रमाणे, सोलू ते वडगाव शिंदे हा रिंगरोडचा भाग जो पुणे महापालिका हद्दीपर्यंत असून पीएमआरडीएकडून विकसित करण्यात येणार आहे,

तर पुणे महापालिका हद्दीतील वडगाव शिंदे ते लोहगाव ते वाघोली हा रिंगरोडचा भाग ५.७० किलोमीटर पुणे महापालिका विकसित करणार आहे.

त्यानुसार पहिल्या टप्यातील भूसंपादनाअंतर्गत मौजे सोलू, वडगाव शिंदे व निरगुडी या गावातील भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली आहे.

याबाबत वडगाव शिंदे येथील प्रकल्पात बाधित शेतकऱ्यांची बैठक घेऊन सहमती देण्यासंदर्भात माहिती देण्यात आली.

तसेच मौजे वड्गाव शिंदे येथील एकूण ५.७१ हेक्टर एवढे क्षेत्रफळ रिंगरोडने बाधित होत असून या ठिकाणची मोजणी प्रक्रिया सुरू केल्याची माहिती पीएमआरडीएचे उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी दिली.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *