Lakshadweep Trip : गेल्या काही दिवसांपासून लक्षद्वीप बाबत मोठ्या चर्चा रंगल्या आहेत. खरे तर नुकत्याच काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या एक्स हँडलवर लक्षद्वीपचे फोटो पोस्ट केले होते. यानंतर या फोटोज वर कमेंट करताना अनेकांनी लक्षद्वीपची तुलना मालदिवशी केली होती.
एवढेच नाही तर लक्षद्वीप हे मालदीव पेक्षाही सुंदर आहे असे म्हटले होते. लक्षद्वीपची सुंदरता भारतीयांना मोठी भावली. नरेंद्र मोदी यांचा स्टनिंग अवतार आणि लक्षद्वीपची सुंदरता यामुळे या फोटोजची सर्वत्र चर्चा पाहायला मिळाली.
मात्र मालदीव सरकारमधील काही मंत्र्यांना याची मळमळ झाली. त्यांनी लक्षद्वीपवर निशाणा साधला आणि भारताच्या पंतप्रधानांसाठी अभद्र भाषेचा वापर केला. यानंतर भारतीय पर्यटकांनी मालदीववर निशाणा साधला.
अनेक पर्यटकांनी मालदीवची ट्रिप रद्द केली. तर इकडे लक्षद्वीप ला जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान लक्षद्वीप ला जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी आजची ही बातमी खूपच खास राहणार आहे.
कारण की आज आपण लक्षद्वीप ला जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी संपूर्ण बजेट ची माहिती घेऊन हजर झालो आहोत. आज आपण चार दिवसांसाठीच्या लक्षद्वीप ट्रीप ला किती खर्च येऊ शकतो याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
समुद्राच्या मधोमध बसलेल्या लक्षद्वीप ला जाण्यासाठी कोणते मार्ग उपलब्ध आहेत आणि यासाठी किती खर्च येतो असा प्रश्न अनेकांच्या माध्यमातून उपस्थित केला जात होता. लक्षद्विप हे एक केंद्रशासित प्रदेश आहे. येथे विमानाने किंवा पॅसेंजर क्रूजने पोहोचता येते.
लक्षद्वीपला कसं जाणार?
जर तुम्हाला विमानाने लक्षद्वीप ला जायचे असेल तर यासाठी सर्वप्रथम दिल्ली किंवा मुंबईवरून केरळ येथील कोची या ठिकाणी जावे लागणार आहे. याचे भाडे सात ते दहा हजारापर्यंत असते. यानंतर तुम्हाला कोचीवरून लक्षद्वीप ला जावे लागणार आहे.
हा प्रवास देखील तुम्हाला विमानाने करावा लागणार आहे. यासाठी तुम्हाला पाच ते सहा हजारापर्यंत चा खर्च करावा लागू शकतो. जर तुम्हाला पॅसेंजर क्रुजद्वारे लक्षद्वीप जायचे असेल तर 25000 ते 37000 पर्यंतचा खर्च तुम्हाला येऊ शकतो.
लक्षद्वीप समुद्रम पॅकेज अंतर्गत तुम्हाला या ट्रिपचा समुद्राने जाऊन समुद्राचा आनंद देखील घेता येणार आहे. या ठिकाणी राहण्याचा खर्च प्रत्येक दिवसासाठी 3000 ते 25 हजार दरम्यान असू शकतो. येथे बंगाराम, कदमत, कावारत्ती आणि थिन्नाकारा यांसारख्या बेटांवर तुम्हाला रूम उपलब्ध होणार आहेत.
एवढेच नाही तर लक्षद्वीप टुरिझमच्या अधिकृत साइटवर जाऊन तुम्हाला टूर पॅकेज देखील घेता येणार आहे. येथे तुम्हाला पाच दिवसांचे टूर पॅकेज उपलब्ध होऊ शकते. यामध्ये जेवणाचा, प्रवासाचा आणि राहण्याचा खर्च समाविष्ट राहणार आहे. याचा खर्च हा साधारणता पंचवीस हजार पाचशे ते 37 हजार 500 दरम्यान जातो. यासाठी तुम्हाला पाच टक्के जीएसटी देखील द्यावी लागते.