Health : आजकालच्या या धावपळीच्या युगात लोकं खूप व्यस्त असतात. त्यांना एकेकांशी बोलायला देखील वेळ नसतो. मोबाईल आल्यामुळे बरेच लोक एकटे पडले आहेत. अशातच अनेक लोकं गप्प राहतात पण तुम्हाला माहिती आहे का? आपण गप्प राहिल्याने शरीराला इतर अनेक फायदे होतात. होय हे खरे आहे. चला याबद्दल जाणून घेऊया.
जेव्हा तुम्ही शांतपणे बसता तेव्हा तुम्हाला तुमच्या शरीराची आणि मनाची जाणीव होते. अशा परिस्थितीत तुम्ही स्वतःकडे अधिक लक्ष देऊ शकता. तुम्हाला तुमचे विचार आणि भावना पाहण्याची आणि समजून घेण्याची संधी मिळते.आजच्या धावपळीच्या जीवनात बहुतेक लोकांना तणावाचा सामना करावा लागतो. पण मौन धारण करून तुम्हाला आराम वाटेल. कारण गप्प राहिल्याने आपल्या शरीरातील कोर्टिसोल एड्रेनालिनची पातळी कमी होते, ज्यामुळे आपला ताण कमी होतो.
आपण सगळेच जाणतो आपल्या शरीरातील निम्म्या रोगांचे कारण तणाव आहे, अशा स्थितीत आपण मौन पाळल्याने तणाव दूर होतो, तसेच आपले टेन्शन कमी झाल्यामुळे आपल्याला चांगली झोप लागते. आणि पण ताजेतवाने होतो.
मौन धारण करून किंवा काही क्षण शांत राहून आपण कोणत्याही गोष्टीकडे चांगले लक्ष देऊ शकतो. मौन आपल्याला मन शांत करण्यास मदत करते. अशा शांत वातावरणात अधिक चांगले लक्ष केंद्रित करण्यास मदत होते.