Jio Recharge Plan : जिओच्या ग्राहकांसाठी कंपनीच्या माध्यमातून वेगवेगळे रिचार्ज प्लॅन लॉन्च करण्यात आले आहेत. कंपनीने शॉर्ट टर्म व्हॅलिडीटीचे आणि लॉन्ग टर्म व्हॅलिडीटीचे असे अनेक प्लॅन लॉन्च केले आहेत जे की ग्राहकांच्या बजेटमध्ये आहेत.
दरम्यान, आज आपण लॉन्ग टर्म व्हॅलिडीटीचा जिओच्या अशा एका प्लॅनची माहिती जाणून घेणार आहोत ज्याची व्हॅलिडीटी तब्बल 336 दिवसांची आहे आणि या प्लॅनने रिचार्ज केल्यास ग्राहकांना अनलिमिटेड 5g डेटा वापरता येणार आहे.
म्हणजेच एकदा रिचार्ज केल्यानंतर ग्राहकांना अनलिमिटेड इंटरनेट वापरता येणार आहे. खरंतर रिलायन्स जिओ ही भारतातील एक आघाडीची टेलिकॉम कंपनी आहे. जिओची ग्राहक संख्या गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
जिओ प्रमाणेच एअरटेलची ग्राहक संख्या देखील गेल्या काही महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली असून या दोन्ही कंपन्यांमध्ये सध्या तगडे कॉम्पिटिशन पाहायला मिळत आहे.
त्यामुळे एअरटेल आणि जिओ आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कमी पैशात अधिक लाभ देण्याचा प्रयत्न करत आहेत. या दोन्ही कंपन्यांनी आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळे रिचार्ज प्लॅन लॉन्च केले आहेत. आज आपण 336 दिवसांची व्हॅलिडीटी असणारा जिओचा असाच एक प्लॅन समजून घेणार आहोत.
कसा आहे जिओचा 336 दिवसांची व्हॅलिडीटी असणारा रिचार्ज प्लॅन
रिलायन्स जिओ कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी 2545 रुपयांचा रिचार्ज प्लॅन लॉन्च केला आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 336 दिवसांची व्हॅलिडीटी मिळते. जर तुम्हालाही दर महिन्याला रिचार्ज करण्याचा कंटाळा येत असेल तर तुम्ही या प्लॅन ने रिचार्ज करून लॉंग टर्म व्हॅलिडीटी मिळवू शकणार आहात.
या प्लॅन सोबत ग्राहकांना दररोज दीड जीबी डेटा वापरायला मिळतो. विशेष म्हणजे जिथे फाईव जी नेटवर्क आहे आणि ज्या ग्राहकांचे 5g मोबाईल आहेत त्यांना अनलिमिटेड डाटा मिळणार आहे.
म्हणजे या प्लॅन सोबत फक्त दिवसाला दीड जीबी डेटा मिळत असला तरी देखील जिथे फाईव जी नेटवर्क आहे आणि ज्या ग्राहकांचे 5g हँडसेट आहेत त्यांनी या प्लॅनने रिचार्ज केल्यास त्यांना हवा तेवढा इंटरनेट डाटा वापरता येणार आहे.
यासोबतच या प्लॅनने रिचार्ज केल्यास ग्राहकांना दररोज शंभर एसएमएस मिळणार आहेत. तसेच अनलिमिटेड कॉलिंगचा देखील लाभ ग्राहकांना दिला जाणार आहे.
हा लॉंग टर्म व्हॅलिडीटी असणारा प्रीपेड प्लॅन ग्राहकांमध्ये खूपच लोकप्रिय असून या प्लॅनने रिचार्ज करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. परंतु हा रिचार्ज प्लॅन फक्त स्मार्टफोन युजर ग्राहकांसाठी आहे. जिओ फोनसाठी हा रिचार्ज प्लॅन नाही.