Haunted Places : सुट्टीत रोड ट्रिप करायला कोणाला आवडत नाही? पण समजा तो रस्ता भुतिया निघाला तर? हे ऐकून तुम्हाला कदाचित थोड विचित्र वाटेल, पण भारतात असे रस्ते अनेक आहेत ज्यांना भुतिया रस्त्यांचा टॅग मिळाला आहे. असे अनेक मार्ग आहेत, जिथे गेलेली माणसे काहीवेळा परत आलेली नाहीत. आज आम्ही तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून अशाच रस्त्याबद्दल सांगणार आहोत जी झपाटलेले आहेत. आणि या रस्त्यांवरचा प्रत्येकाचा वेगवगेला अनुभव आहे. चला तर मग थोडाही उशीर न करता या रस्त्यांबद्दल जाणून घेऊया.
कसारा घाट
मुंबई-नाशिक महामार्गावर असलेल्या कसारा घाटाला झपाटलेल्या रस्त्याचा टॅग मिळाला आहे. अनेक लोकांनी येथे अलौकिक क्रियाकलाप पाहिले आहेत. लोक असेही म्हणतात की, जेव्हा ते येथून जातात तेव्हा त्यांना डोके नसलेली वृद्ध स्त्री दिसते. ऐकायला विचित्र वाटेल पण हे खरे आहे. येथे होणारे अपघातही खूप विचित्र आहेत. आणि म्हणूनच या ठिकाणाला झपाटलेले ठिकाण म्हंटले जाते.
आरे कॉलनी, मुंबई
मुंबईच्या आरे कॉलनीत दिवसभरात खूप हालचाल पाहायला मिळते. रात्रीबद्दल बोलायचे झाले तर रात्री इथे कोणी दिसत नाही. असे म्हणतात की रात्रीच्या वेळी पांढऱ्या साडीतील एक महिला कारवाल्यांकडून लिफ्ट मागते. असे अनेक लोकांच्या बाबतीत घडले आहे. आणि त्या स्त्रीला लिफ्ट देताच ही स्त्री कारमध्ये उपस्थित सर्व लोकांना मारून टाकते, या गोष्टीत किती सत्यता आहे, हे माहित नाही, पण येथे जाणाऱ्या बऱ्याच लोंकाचे असेच विचित्र अनुभव आहेत
काशेडी घाट
मुंबई गोवा महामार्गावरील केवळ काशेडी घाटच नाही, तर संपूर्ण महामार्गच पछाडलेला असल्याचे मानले जाते. या महामार्गाच्या अनेक कथा आहेत. रात्रीच्या वेळी एक महिला येथून जाणाऱ्या लोकांना थांबवते आणि गाडी न थांबवता पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचा पुढे जाऊन अपघात होतो, असे लोकांचे म्हणणे आहे. अशा अनेक घटना येथे घडल्या आहेत, म्हणूनच या ठिकाणाला झपाटलेले ठिकाण म्हणून ओळखले जाते.