Electric Bike : इलेक्ट्रिक टू-व्हीलर उत्पादक कबीरा मोबिलिटीने आपली फ्लॅगशिप इलेक्ट्रिक बाइक KM5000 सादर केली आहे. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, ही बाईक ताशी 188 किलोमीटर वेगाने धावू शकते आणि एका चार्जवर जास्तीत जास्त 344 किलोमीटर अंतर कापते. कबीरा मोबिलिटीने सांगितले की, या वर्षी औपचारिकपणे ही बाईक बाजारात आणण्याची त्यांची योजना आहे आणि 2024 मध्ये ग्राहकांना पुरवठा सुरू करेल.
KM5000 इलेक्ट्रिक बाइकची किंमत
गोव्यात या इलेक्ट्रिक बाइकची शोरूम किंमत 3.15 लाख रुपयांपासून सुरू होण्याची शक्यता आहे. KM5000 11.6 kW चा स्मार्ट वॉटर-कूल्ड LFP बॅटरी पॅकसह सुसज्ज आहे, जो एका चार्जवर 344 किमीची रेंज प्रदान करतो. ही बॅटरी इलेक्ट्रिक 02 व्हीलरमधील सर्वात मोठ्या बॅटरी पॅकपैकी एक आहे.
KM5000 इलेक्ट्रिक बाइकची वैशिष्ट्ये
4G कनेक्टिव्हिटीसह 7 इंचाचा स्मार्ट डिजिटल डॅशबोर्ड बाईकचे आकर्षण वाढवतो. इलेक्ट्रिक बाइकला ड्युअल फ्रंट आणि सिंगल रिअर हायड्रॉलिक डिस्क ब्रेकसह ड्युअल चॅनल अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) मिळते. KM5000 मध्ये दोन चार्जिंग पर्याय उपलब्ध आहेत. पहिला- हाय-स्पीड ऑनबोर्ड चार्जर 2 तासांत 80% चार्ज करण्यासाठी आणि दुसरा- मानक चार्जिंगसाठी एक मानक पोर्टेबल चार्जर.
कबीरा मोबिलिटीचे सीईओ जबीर सिवाच म्हणाले, “इलेक्ट्रिक बाईक सेगमेंट काय करू शकतो याचा बार आम्ही सतत वाढवत आहोत. नवीन बाईक KM5000 ही आमच्या विश्वासाची साक्ष आहे की कामगिरी आणि सुरक्षिततेच्या बाबतीत इलेक्ट्रिक बाईक पेट्रोल बाईकपेक्षा चांगल्या नसल्या तरी बरोबरीच्या आहेत. ते म्हणाले की कंपनीची अनेक उत्पादने उत्पादन प्रक्रियेत आहेत आणि लवकरच बाजारात आणली जातील.