Indias Famous Temple : सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत. विद्यार्थ्यांना सुट्ट्या लागलेल्या आहेत. यामुळे अनेक जण आपल्या परिवारासमवेत पिकनिकच्या तयारीत आहेत. काहीजण उन्हाळीच्या सुट्टीचे औचित्य साधून देवदर्शनाला जाण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान जर तुम्हालाही या उन्हाळ्याच्या सुट्टीत देवदर्शनासाठी जायचे असेल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खूपच कामाची ठरणार आहे. कारण की आज आपण उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये देशातील कोणत्या तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या जाऊ शकतात याविषयी जाणून घेणार आहोत.
तुम्हीही तुमच्या परिवारासमवेत जर उन्हाळी सुट्ट्या तीर्थक्षेत्रावर जाऊन घालवण्याच्या तयारीत असाल, नेहमीच्या धगधगीच्या आयुष्यातून तुम्हालाही मनाला प्रसन्न वाटावे अशा वातावरणात जायचे असेल तर देशातील या प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांना भेटी देऊ शकतात. येथे गेल्यानंतर तुमच्या मनाला खूपच प्रसन्न वाटणार आहे आणि तुमच्या मनातले ओझे हलके होणार आहे.
अयोध्या : 22 जानेवारी 2024 ला श्रीक्षेत्र आयोध्या येथील भव्य श्री रामरायांच्या मंदिराचे उद्घाटन संपन्न झाले आहे. गेल्या पाच शतकांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर प्रभू रामराया भव्य अशा मंदिरात विराजमान झाले आहेत. यामुळे तुम्ही श्रीक्षेत्र अयोध्याला यंदा नक्कीच भेट दिली पाहिजे. येथे तुम्ही तुमच्या परिवारासमवेत गेलात तर खूपच प्रसन्न वातावरणाची अनुभूती तुम्हाला घेता येणार आहे.
वैष्णोदेवी मंदिर : जर तुम्ही उन्हाळी सुट्ट्यांमध्ये जम्मू-काश्मीरला जाण्याच्या तयारीत असाल तर पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून संबोधल्या जाणाऱ्या जम्मू-काश्मीरमधील त्रिकुटा पर्वतांमध्ये स्थित वैष्णोदेवी मंदिराला नक्कीच भेट द्या. येथे संपूर्ण जगभरातील हिंदू सनातनी भाविक दर्शनासाठी गर्दी करत असतात.
त्यामुळे जर तुमचाही जम्मू-काश्मीर दर्शनाचा प्लॅन असेल तर सर्वप्रथम वैष्णोदेवी मातेचे दर्शन घेऊन तुम्ही इतर ठिकाणांना भेट दिली पाहिजे. येथे गेल्यानंतरही तुम्हाला धार्मिक वातावरण पाहायला मिळेल.
श्री काशी विश्वनाथ मंदिर : उन्हाळ्याच्या सुट्टीत जर तुम्ही देवदर्शनाच्या तयारीत असाल तर वाराणसी येथील श्री काशी विश्वनाथ मंदिराला नक्कीच भेट दिली पाहिजे. काशी, असी व वरुणा या नद्यांच्या संगमावर वसल्याने या शहराला ‘वाराणसी’ हे नाव पडले आहे. हे तीर्थक्षेत्र हिंदू सनातन धर्मातील सर्वात पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते.
ऋषिकेश : उत्तराखंड मधील ऋषिकेश येथे तुम्हाला अनेक देवी देवतांची मंदिरे पाहायला मिळतील. जर कधी तुम्ही उत्तराखंड फिरायला गेलात तर ऋषिकेश ला जायला विसरू नका. ऋषिकेशला जगाची योग राजधानी म्हणून ओळखले जाते.
तिरुपती बालाजी मंदिर : आंध्रप्रदेश राज्यातील तिरुपती बालाजी मंदिर हे जगभरात प्रसिद्ध आहे. येथे दररोज हजारोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी गर्दी करत असतात. जर तुमचाही या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये कुठे तीर्थक्षेत्रावर जाण्याचा विचार असेल तर आंध्र प्रदेश राज्यातील तिरुपती बालाजी मंदिर हे तुमच्यासाठी परफेक्ट ठिकाण ठरणार आहे. भगवान विष्णूंचे हे मंदिर संपूर्ण जगातील प्रसिद्ध मंदिरांमध्ये गणले जाते.