Indias Famous Hill Station : सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत. यामुळे देशभरातील पर्यटन स्थळांवर पर्यटकांची मोठी वर्दळ पाहायला मिळत आहे. दरवर्षी उन्हाळी सुट्ट्यांमध्ये पर्यटन स्थळांवर मोठी गर्दी होत असते. यंदा देखील तशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे.

रेल्वे स्थानकावर पर्यटक गर्दी करत आहे. दरम्यान जर तुम्हीही उन्हाळी सुट्ट्यांमध्ये तुमच्या परिवारासमवेत किंवा मित्रांसमवेत कुठे फिरायला जाण्याचा तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच खास करणार आहे.

कारण की आज आपण भारतातील सर्वात सुंदर हिल स्टेशनची माहिती पाहणार आहोत. आज आपण ज्या हिल स्टेशनची माहिती पाहणार आहोत ते अगदीच स्कॉटलँड सारखे आहे. याला भारतातील स्कॉटलँड म्हणून संबोधले जात आहे. 

कोणते आहे ते Hill Station ? 

उन्हाळी सुट्ट्यांमध्ये अनेकजण विदेशात फिरायला जातात. स्कॉटलँड जाणाऱ्यांची संख्या देखील खूपच अधिक आहे. मात्र आपल्या भारतात देखील फिरण्यासारखें अनेक स्पॉट आहेत जे की तुम्हाला विदेशातही सापडणार नाहीत.

असेच एक पिकनिक स्पॉट आहे शिलॉंग. मेघालय राज्याची राजधानी शिलाँग पर्यटकांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. या ठिकाणी देश विदेशातील पर्यटक हजेरी लावतात. या पिकनिक स्पॉट वर तुम्हाला नेहमीच गर्दी पाहायला मिळेल.

खरेतर हे एक देशातील सर्वाधिक लोकप्रिय हिल स्टेशन आहे. त्यामुळे येथे उन्हाळ्यात मोठी गर्दी असते. आपल्या राज्यातीलही अनेक लोक शिलॉंगला पर्यटनासाठी जातात.

दरम्यान, जर तुम्हीही यंदाच्या उन्हाळ्यात आपल्या परिवारासमवेत, मित्रांसमवेत किंवा तुम्ही तुमच्या लव लाइफ सोबत पिकनिकला निघणार असाल, कुठे सहलीला जाणार असाल तर हे ठिकाण तुमच्यासाठी परफेक्ट ठरणार आहे.

शिलॉंगला पूर्वेतील स्कॉटलँड म्हणून ओळखले जाते. जर तुम्ही येथे फिरायला गेलात तर तुम्हाला येथे अनेक सुंदर सुंदर पॉईंट पाहायला मिळतील.

या ठिकाणी हनिमूनला येणाऱ्या जोडप्यांची देखील गर्दी असते. नवविवाहित जोडपे हनिमून साठी या शहराला विशेष पसंती दाखवतात. शिलॉंग येथील नयनरम्य दृश्य तुमची पिकनिक निश्चितचं आनंदी बनवणार आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *