India New Expressway : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रासहित संपूर्ण भारतात महामार्गांचे जाळे विणले गेले आहे. विविध महामार्गांची कामे पूर्णत्वास गेली आहेत. यामुळे देशाची दळणवळण व्यवस्था आधीच्या तुलनेत आणखी मजबूत झाली आहे. विशेष बाब अशी की, या वर्षाअखेरपर्यंत देशात आणखी काही महत्त्वाचे महामार्ग वाहतुकीसाठी सुरू केले जाणार आहेत.
सध्या देशात एकूण 36 महामार्गांचे कामे सुरू असल्याची माहिती समोर आली असून यापैकी 5 महामार्ग यावर्षी अखेरपर्यंत अर्थातच 2024 अखेरपर्यंत सुरू होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
अशा परिस्थितीत, आज आपण 2024 मध्ये कोणते महत्त्वाचे 5 महामार्ग सुरू होणार याविषयी अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.
2024 मध्ये कोणते महामार्ग सुरू होणार ?
चेन्नई-बेंगलोर एक्सप्रेस वे : हा भारतातील तुमची आठवण किलोमीटर लांबीचा महामार्ग चेन्नई आणि बंगलोर या दोन शहरांना जोडणारा आहे. यासाठी 18000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून याची लांबी 258 किलोमीटर एवढी राहणार आहे. दरम्यान, हा महामार्ग 2024 अखेरपर्यंत सुरू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे चेन्नई ते बेंगलोर हा प्रवास फक्त दोन तासात पूर्ण होणार अशी आशा आहे.
दिल्ली-मुंबई-वडोदरा एक्सप्रेस वे : दुसरीकडे दिल्ली-मुंबई-वडोदरा एक्सप्रेस वे देखील 2024 अखेरपर्यंत सुरू होण्याची दाट शक्यता जाणकारांच्या माध्यमातून वर्तवली जात आहे. हा महामार्ग भारतातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग म्हणून ओळखला जाणार आहे.
या मार्गाची लांबी 1380 किलोमीटर एवढी असून यासाठी एक लाख कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. हा महामार्ग महाराष्ट्र सहित सहा राज्यांमधून जाणार आहे.
दिल्ली-देहरादुन एक्सप्रेस वे : हा भारतातील आणखी एक महत्त्वाचा महामार्ग आहे. हा 248.6 किलोमीटर लांबीचा महामार्ग असून सध्या स्थितीला याचे काम सुरू आहे. या महामार्गामुळे दिल्ली ते देहरादून हा प्रवास फक्त अडीच तासात पूर्ण होऊ शकणार आहे.
सध्या या प्रवासासाठी जवळपास सहा तासांचा कालावधी खर्च करावा लागत आहे. हा देखील मार्ग यावर्षी अखेरपर्यंत चालू होण्याची शक्यता आहे. या महामार्गासाठी 13000 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.
सुरत-चेन्नई एक्सप्रेस वे : हा महामार्ग महाराष्ट्रातून जातो. या महामार्गाची लांबी 1271 किलोमीटर एवढी असून सध्या स्थितीला महाराष्ट्रात या मार्गाचे भूसंपादनाचे काम सुरू आहे. या महामार्गासाठी 45 हजार कोटी रुपयांचा खर्च केला जाणार असून याचे काम 2026 पर्यंत पूर्ण होणार आहे.
रायपूर-विशाखापटनम एक्सप्रेस वे : छत्तीसगड, ओडिशा आणि आंध्र प्रदेश या राज्यांना जोडणारा हा महामार्ग 465 किलोमीटर लांबीचा आहे. या महामार्गाच्या कामासाठी जवळपास 20,000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. विशेष म्हणजे हा महामार्ग या चालू वर्षातच पूर्ण होण्याची शक्यता आहे. यामुळे या तिन्ही राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.