India Longest Skyglass Bridge : तुम्हाला भारतातील सर्वाधिक लांबीचा काचेचा पूल माहिती आहे का ? हो बरोबर वाचलंय तुम्ही, आम्ही बोलतोय सर्वाधिक लांबीच्या काचेच्या पूलाविषयी. खरंतर, भारतात असे अनेक पूल आहेत जे दोन रस्त्यांना जोडतात.
काही असे पूल आहेत जे की उत्कृष्ट वास्तुकलेची उदाहरण देखील सेट करत आहेत. मात्र, आज आपण अशा काचेच्या पुलाची माहिती जाणून घेणार आहोत जो की पर्यटकांना खूपच आकर्षित करत आहे.
चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया भारतातील सर्वाधिक लांबीचा काचेचा पूल कुठे तयार करण्यात आलेला आहे ?
भारतातील सर्वाधिक लांबीचा काचेचा पूल ?
केरळच्या वागमोन कोलाहलामेडू अॅडव्हेंचर गावामध्ये हा पूल तयार करण्यात आलेला आहे. देशातील सर्वात लांब काचेचा पूल येथे बांधण्यात आला आहे.
यामुळे या ठिकाणी दररोज पर्यटकांची वर्दळ पाहायला मिळते. समुद्रसपाटीपासून जवळपास 3500 किलोमीटर उंचीवर वसलेला हा देशातील सर्वाधिक लांबीचा काचेचा पूल असून याची लांबी 40 मीटर एवढी आहे.
केरळमध्ये तयार करण्यात आलेला हा सर्वाधिक लांबीचा काचेचा पूल तयार करण्यासाठी स्पेशल काच उपयोगात आणली गेली आहे.
विशेष म्हणजे हा काच जर्मनीतून आयात करण्यात आला होता. हा पूल तयार करण्यासाठी जवळपास 35 टन लोखंड वापरले गेले आहे. या पूलाजवळ एक ॲडव्हेंचर पार्क देखील आहे.
या ठिकाणी पॅराग्लाइडिंग आणि ट्रेकिंग करता येते. त्यामुळे येथे पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. पण हा पूल पाहण्यासाठी पर्यटकांना प्रतिव्यक्ती 250 रुपये एवढे पैसे मोजावे लागतात.
कस पोहचता येणार
जर तुम्ही हा काचेचा पूल पाहण्यासाठी जाणार असाल तर सर्वप्रथम तुम्हाला कोझिकोड विमानतळ किंवा कोझिकोड रेल्वे स्टेशनवर जावे लागेल. येथे गेल्यानंतर तुम्हाला वायनाडला जावे लागणार आहे. येथून तुम्हाला टॅक्सी उपलब्ध होणार आहे.